दक्षिण अमेरिकेतील जगप्रसिद्ध विशाल महाकाय Amazon Rainforest मध्ये आढळणारा एक आगळावेगळा प्राणी म्हणजे Armadillo-अरमाडिल्लो होय.हा एक शाकाहारी प्राणी असून sloths आणि anteaters हे त्याच्या जवळच्या कुळातील प्राणी आहेत. या प्राणी प्रकारातील Giant Armadillo हा एक वेगळ्या प्रकारचा प्राणी आहे. सर्वसाधारणपणे दक्षिण अमेरिकेतील मध्यवर्ती उबदार पट्टयांत हा अरमाडिल्लो आढळतो. भारतात आढळणारा खवल्या मांजर आणि अरमाडिल्लो यात बरेच साधर्म्य आहे. फळे, अंडी, मुंग्या, लहान प्राणी, मृत जनावारांचे मांस हे अमाडिल्लोचे अन्न आहे. अरमाडिल्लो हे सस्तन प्राणी वर्गातील प्राणी असून त्याची एका वेळी चार ते पाच पिल्ले असू शकतात. पॅराग्वे देशात अर्माडिल्लो मोठ्या प्रमाणात आढळतात. त्याच्या पाठीवर सुरक्षा म्हणून असणाऱ्या हाडाच्या खवल्या हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे.