दक्षिण अमेरिकेतील पश्चिमेकडील पटट्यात आढळणारे आगळेवेगळे, केसाळ माकड म्हणजे pygmy marmoset होय. Amazon rainforest मधील हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणायला हरकत नाही. या माकडाच्या अंगावर अस्वलाच्या अंगावर जसे लांबलचक केस असतात, तसेच पण झुपकेदार हिरवट, तांबूस रंगाचे असतात. ही माकडे आपली स्वतःच्या कुटुंबाची छोटीशी टोळी करून राहतात. जगातील सर्वांत लहान माकड अशी या पिग्मी मार्मोसेट माकडाची ओळख आहे. या माकडाची लांबी 4.5 ते 6.5 इंच असते; तर त्याच्या शेपटीची लांबी 7 ते 9 इंच असते. यावरून कल्पना करा की हे पिग्मी माकड किती लहान असेल ते ! या माकडाचे वजन 100 ते 110 ग्रॅम असते. हे माकड आकाराने खूप लहान असले तरी ते या झाडावरुन त्या झाडावर 5 मीटरपर्यंत उडी मारु शकते. फळे, कीटक, लहान सरडे इत्यादी त्याचे अन्न आहे. हे माकड 15 ते 20 वर्षे जगू शकते.
हे सुद्धा आवर्जून वाचा