Amazon Rainforest: Orchid – ऑर्किड

अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये अनेक एकापेक्षा एक सुंदर फुलझाडे, फुलवेली आहेत, Orchids ही फुलझाडे orchidaceae या वैज्ञानिक नावानेही ओळखली जातात. या फुलझाडांचे वैशिष्ट्य जगात सर्वत्र आढळणारे हे फुलझाड असले, तरी ॲमेझॉनच्या जंगलात आढळणाऱ्या ऑर्किड च्या फुलांची तुलना इतर कोणत्याही देशातील ऑर्किडच्या फुलांशी करता येणार नाही. म्हणूनच या फुलझाडांना ॲमेझॉनच्या जंगलातील मूळ रहिवाशी असे म्हटले जाते. संपूर्ण जगात ऑर्किडच्या 30,000 प्रजाती आहेत. म्हणूनच Orchids are the Part of the world असे म्हटले जाते. हे जरी खरे असले तरी ॲमेझॉनच्या जंगलातील ऑर्किड्स च्या रंगांचे सौंदर्य वेगळेच !

ॲमेझॉनच्या जंगलात ऑर्किड्सची फुले सप्तरंगात पाहायला मिळतात. म्हणजे ती वेगवेगळ्या रंगांत उपलब्ध आहेत. त्यांचे आकारही वेगवेगळे आहेत. ऑर्किड या फुलाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या फुलाचा गंध खूप आकर्षक आहे. ऑर्किडच्या अनेक प्रजातींची फुले रात्रीच्या वेळी फुलतात आणि आपल्या सुगंधाने सभोवतालचे वातावरण प्रसन्न आणि सुगंधित करतात. व्हॅनिला आईसक्रीममध्ये चवीसाठी ऑर्किडचा गंध टाकतात. विविध प्रकारचे sent (अत्तर) बनवण्यासाठी सुद्‌धा ऑर्किडचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. ऑर्किडच्या फुलांचा व्यापार जगभर चालतो. या फुलांचा खूप मागणी आहे.

Amazon Rainforest :Pitcher Plant: घटपर्णी

Leave a comment