वेगवेगळ्या प्रकाराचे, वेगवेगळ्या आकाराचे हजारोंच्या संख्येने पशुपक्षी असलेले ठिकाण म्हणजे Amazon rainforest होय. hog-nosed skunk हा दक्षिण आणि मध्यवर्ती अमेरिकन Amazon rainforest मध्ये आढळतो. skunk च्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. पाठीवर पांढरा पट्टा आणि पाठीच्या कण्यावरुन काळा पट्टा असलेला हा डुकराच्या नाकासारखे नाक असलेला स्कंक ॲमेझॉनच्या जंगलातील एक चपळ प्राणी आहे. स्कंकच्या अनेक प्रजातीमध्ये अमेरिकेच्या ॲमेझॉन जंगलातील हॉग नोझ्ड स्कंक हा आकाराने सर्वांत मोठा आहे. सर्वसाधारणपणे 40 ते 90 सेमीपर्यंत लांबी आणि 1.5 ते 8.00 किलोग्रॅम पर्यंत त्याचे वजन असते. त्याच्या प्रत्येक पायाला पाच बोटे असतात. पायाचे तळवे मऊ गादीसारखे असतात. काही स्कंक तपकिरी किंवा करड्या रंगाचे पण आढळतात. याची शेपटी झुपकेदार असते. स्कंक आपल्या मुत्राद्वारे दुर्गंधी पसरवून आपले संरक्षण करतो.इतर प्राणी या दुर्गधयुक्त परिसरात थांबतही नाहीत. हा स्कंक पोलेकॅट नावाने सुद्धा ओळखला जातो.