Amazon Rainforest : Laughing Falcon : हसणारा बहिरी ससाणा 

या पृथ्वीतलावर शिकार करण्यात अनेक पक्षी पटाईत असतात. बहिरी ससाणा हा पक्षी सुद्धा शिकारीसाठी खूप तरबेज आहे. आकाशात खूप उंचावरून आपले भक्ष्य शोधतो. याची नजर प्रचंड तीक्ष्ण असते. आकाशातून 500 ते 600 मी अंतरावरून हा प्राणी जमिनीवरील ससा, उंदीर यासारखे प्राणी सहज पाहू शकतो. तो शिकार हेरतो आणि त्या दिशेने प्रचंड वेगाने झेप घेऊन आपले भक्ष्य पकडून आकाशात पुन्हा उड्डाण करतो आणि दूर जाऊन भक्ष्याचा फडशा पाडतो. बहिरी ससाणा हा पूर्णतः मांसाहारी प्राणी आहे. दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये आढळणाऱ्या बहिरी ससाण्याला Laughing Falcon असे म्हणतात. हे पक्षी प्रजनन काळात एकमेकाला मोठमोठा आवाज काढून आकर्षित करतात. त्यांचा हा आवाज हसण्यासारखा येतो. म्हणूनच त्यांना हसणारा बाज’ किंवा हसणारा ससाणा असे म्हणतात.
या पक्षाची मादी नरापेक्षा आकाराने मोठी असते. बऱ्याचवेळा ऋतुमाना- नुसार या पक्षाच्या रंगात काही अंशी बदल होत असतो.

Amazon rainforest: Amazon kingfisher

Leave a comment