प्रत्येक पक्ष्याच्या शेकडो प्रजाती असतात.जनुकीय गुणधर्मानुसार प्रजाती ठरत असतात. तशाच लांब पाय असलेल्या सुमारे 60 हून अधिक बगळ्याच्या प्रजाती आहेत. हेरॉन-Herom हा एक असाच पक्षी आहे, जो दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये दलदलीच्या प्रदेशात आढळतो असे नाही.हा स्थलांतरित पक्षी असल्याने अनेक देशांत आढळतो.हेरॉनचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या छातीवरील पिसे पुढच्या दिशेने वाढतात. यामुळे हेरॉन चटकन ओळखता येतात. लांब पाय, लांब मान, करड्या-पांढऱ्या रंगाची पिसे ही सुद्धा हेरॉनची वैशिष्ट्ये आहेत. हा पक्षी नेहमी पाण्याच्या किंवा दलदलीच्या ठिकाणी वास्तव्य करतो. कारण अशा ठिकाणीच त्याला आपले भरपूर खाद्य मिळते. हेरॉन पक्षी मासे आणि पाण्यातील किडे, खेकडे खाऊन आपला उदरनिर्वाह करतात. बहुतांश बगळ्यांच्या प्रजाती या फिरत्या आणि स्थलांतर करणाऱ्या असतात. त्याला हेरॉन अपवाद नाही. हे पक्षी संपूर्ण जगात सर्वत्र फिरत असतात. म्हणून यांना भटकंती करणारे पक्षी असे म्हटले जाते.