वनस्पतींच्या अनेक प्रजाती अशा आहेत की त्या पृथ्वीतलावर सर्वत्र आढळतात. Heliconia flower ची प्रजात पण अशी आहे की ती अनेक देशांत आढळते. Amazon rainforest मध्ये आढळणारी हेलिकोनिया ही वनस्पती अशीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. या वनस्पतींच्या फुलांचा आकार पोपटासारखा असतो, म्हणून काही ठिकाणी या फुलांना Parrot flower असे म्हटले जाते. कोळंबी सारखा असलेल्या लॉबस्टर मासा उलटा केल्यावर जसे चित्र दिसते, तसेच चित्र या हेलिकोनिया फुलाचे दिसते. म्हणून या फुलाला Hanging lobster claw असेही म्हटले जाते. ॲमेझॉनच्या जंगलात दिसणारे हे हेलिकोनियाचे फूल तुम्हाला कोणत्या आकारात दिसते ? यावरच तुम्ही त्यांना कोणत्या नावाने संबोधता हे अवलंबून असते. हेलिकोनियाच्या सुमारे 50 प्रजाती आहेत; पण प्रत्येक प्रजातीच्या फुलांच्या वैशिष्ट्यांमध्ये फरक हा असतोच. ही फुले banana family शी संबंधित असलेल्या प्रजातीशी मिळतीजुळती आहेत. ॲमेझॉनच्या जंगलात सुद्धा या फुलांच्या काही प्रजाती आढळतात; पण यांचे वैशिष्ट्य असे की त्यांना अभूतपूर्व असे सौंदर्य लाभले आहे. आकर्षक रंग लाभला आहे. ॲमेझॉनच्या जंगलात कोठेही गेलात तरी ही फुले आपल्या दृष्टीस पडतात. हमिंग बर्ड (humming bird) या छोट्याशा पक्ष्याचे अस्तित्व ॲमेझॉनच्या जंगलातच आढळते. त्या हमिंग बर्डला या हेलिकोनिया फुलांचा मकरंद खूप आवडतो.