दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest च्या घनदाट अरण्यात एकापेक्षा एक भव्य आणि दिव्य अशी झाडे आहेत. स्विटेनिया मायक्रोफिला हे झाड पण असेच आहे. महोगनीचा वृक्ष उंच, सरळसोट वाढतो. त्याची उंची सुमारे 60 मीटर पर्वत वाढते. तर बुंध्याचा व्यास 80 सेमीपर्यंत होतो. हे झाड सर्वात expensive (महागडे) असल्याने या वनस्पतीची मोठ्या प्रमाणात चोरी होते . त्यामुळे अमेरिकेतील अमेझॉनच्या जंगलातील महोगनी वृक्षांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. दक्षिण आशियाई प्रदेशातही हे वृक्ष आढळतात. भारतात तर एकेकाळी महोगनी वृक्षांचे नंदनवन होते, पण पण बेसुमार वृक्षतोड झाणि तष्करीमुळे या वृक्षांची संख्या झपाट्याने संख्या कमी होत चालली आहे. सध्या या वृक्षाची खास लागवड पण करतात आणि ती मोठी झाल्यावर यांची विक्री करतात. फर्निचरसाठी अत्यंत उपयुक्त, टिकाऊ आणि दीर्घायुषी असे हे लाकूड आहे. तांबूस रंगाचे हे लाकूड सागवानपेक्षा महागडे आहे. कलाकुसरी साठी आणि फर्निचरसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने त्याची बाजारपेठेत मोठी मागणी आहे. या झाडांना सुवासिक पांढरी फुले येतात. भरपूर सूर्यप्रकाश आणि उष्ण हवामान असलेल्या प्रदेशात या वृक्षांची चांगली वाढ होते. निचरा होणारी जमीन या वृक्षांसाठी अधिक पोषक असते. भरपूर पाणी आणि उन्हाळा ऋतू या वृक्षांच्या वाढीसाठी पोषक असतो.