Budhha-Life,work, Dhamma Part 1

गौतम बुद्ध-जीवन, कार्य, धम्म भाग 1

भारतीय संस्कृतीतील एक महान व्यक्तिमत्व म्हणजे भगवान बुद्ध होय. इ.स. पूर्व सहाव्या शतकात भारतात सनातन धर्म फोफावला होता.धार्मिक कर्मकांडाने भारतीय समाजाचे एक प्रकारे शोषणच चालू होते. गौतम बुद्धांच्या पूर्वी सुद्धा कृष्ण, बळीवंशातील राजे यांनी सनातन चालीरीतीला आणि कर्मकांडाला विरोध केला होता. कृष्णाने तर नवीन धर्म (विचारधारा, तत्त्वज्ञान) स्थापन केला होता: पण त्यातही सनातन्यांनी मोडतोड करून आपले विचार, आपले तत्त्वज्ञान घुसवले आणि कृष्णाला विष्णुरुपी अवतार बनवले. सप्तसिंधूच्या प्रदेशात बळीवंशातील एकापेक्षा एक महान राजांनी सदाचाराचा धर्म प्रस्थापित केला होता; पण त्यांच्या सदाचारी, चांगुलपणा, आणि सरळमार्गी विचारांचा पराभव करून विष्णू परंपरेतील राजांनी सनातन धर्म वाढवला. सनातन धर्मात एका विशिष्ट वर्गाचेच हित होते. हा धर्म समाजात भेदाभेद निर्माण करणारा होता. उच्च-नीचता पसरवणारा होता. अशा परिस्थितीत इ.स. पूर्व पाचव्या सहाव्या शतकात गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर जन्माला आले. त्यांनी काल्पनिक आणि अदृश्य शक्तींना नाकारले. संपूर्ण समाजात समानता, न्याय आणण्यासाठी पायाभरणी केली. स्वतंत्र असा विचार मांडला की तो संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी उपयुक्त होईल. समाजातील भेदाभेद कमी होऊन समानता निर्माण होईल. शुद्ध आचरण, शु‌द्ध विचार हा उपदेशाचा आणि तत्त्व‌ज्ञानाचा पाया होता. म्हणूनच बौद्ध धर्म सर्वांना भावला आणि तो सर्वांनी अंगिकारला सुद्धा . धर्माला, विचाराला आणि तत्त्वज्ञानाला राजाश्रय किती महत्त्वाचा असतो, हे सम्राट अशोकाने उचललेल्या पावलामुळे सिद्ध ‌ होते. सम्राट अशोक चक्रवर्ती होता. अजिंक्य होता; पण कलिंगच्या युद्धात झालेल्या अपरिमित मनुष्यहानीमुळे त्याने शस्त्रे खाली ठेवली. त्याला पश्चात्ताप झाला.त्यामुळे त्याने गौतम बुद्धाने निर्माण केलेला बौद्ध धर्म स्वीकारला.त्याने या धर्माचा प्रचार व प्रसार केला. नेपाळ, चीन, जपान, श्रीलंका, मलेशिया, थायलंड, सिंगापोर या भारताच्या भवतालच्या देशांत बौद्ध धर्माचा प्रसार केला. सम्राट अशोकोमुळे संपूर्ण भारत बौद्धमय झाला.

युआम श्वांग या चिनी धर्मगुरुने हजारो किलोमीटरचा प्रवास करून, अनेक संकटाना तोंड देत भारतात प्रवेश केला. भारतीय राजांनी, त्याला राजाश्रय दिला. बौद्ध ‌धर्मावरील ग्रंथ पुरवले. युआन श्वांग हे सर्व साहित्य घेऊन चीनला परतला आणि तेथे बुद्धांच्या विचाराचा प्रसार केला. त्यामुळै चीनमधील बहुतांश लोक बौद्ध धर्मीय आहेत.

काय काहे एवढी बुद्धांच्या विचारात शक्ती? तेच आपल्याला जाणून घ्यायचे आहे. गौतम बुद्ध कालीन तत्कालीन राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था, गौतम बुद्धांचे कुळ, जन्म, बालपण, शाक्य संघाचे सदस्यत्व, परिव्रज्य, सर्वस्वाचा त्याग, दीक्षा, तपस्या आचार, विचार, तत्वज्ञान, उपदेश याबाबतीत आपण सविस्तर मालिकाच लिहिणार आहोत. बुद्ध विचार जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे.

भारतातील मौर्याच्या सत्तेचा र्‍हास होत गेला आणि सनातनी प्रवृत्तीला पुन्हा खतपाणी मिळत गेले. सनातन्यांनी पुन्हा डोके वर काढले. मूठभर लोकांकडून बहुजन समाजाचे शोषण होऊ लागले. समाजात भेदाभेद निर्माण करून आपली भाजून होण्याचे काम या मूठभर लोकांनी केले. एकविसाव्या शतकातही भारतात तीच अवस्था आहे. भारत जातिभेदाने आणि धर्मभेदाने ग्रासलेला आहे. अशा अवस्थेत भारतीय समाजाचीही पुनर्स्थापना होणे काळाची गरज आहे. भारतात शुद्ध विचाराचे वारे पुन्हा वाहणे आवश्यक आहे. हे वारे निर्माण होण्यासाठी आपण झुळूक होऊन कार्य करत राहणे हे माझे कर्तव्य समजतो. बुद्धांच्या जीवनचरित्रावर, तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकणारी मालिका वाचकांना निश्वितच आवडेल अशी आशा आहे.

बुद्धम् शरणम् गच्छामि ।

Leave a comment