Amazon Rainforest :Yellow headed Caracara : पिवळ्या डोक्याचा कराकरा

या निसर्गात प्रत्येक जीव आपले वेगळे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आलेला असतो आणि आपले अस्तित्व टिकवण्यासाठी जीवनभर आटापिटा करत असतो. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळेच पृथ्वीवर जैवविविधता अ‌द्याप टिकून असली तरी मानवी हस्तक्षेमामुळे अनेक प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या पिढ्या नष्ट झालेल्या आहेत. दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये विविध प्रकारची जैवविविधता आढळते. Yellow headed Caracara हा पक्षी सुद्‌धा ॲमेझॉनच्या विशाल महाकाय जंगलात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहे. या पक्ष्याचे सरासरी वजन 310 ते 220 ग्रॅम असते. मादी पक्ष्याचे वजन नराच्या तुलनेत जास्त असते. या पक्षाच्या पंखांच्या दोन्ही टोकांमधील लांबी सरासरी 85 सेमी असते. हा पिवळ्या डोक्याचा हा कराकरा पक्षी जंगलात फिरणाऱ्या शाकाहारी प्राण्यांच्या शरीरावरील किडे आपल्या चोचीने काढून खातो. दक्षिण अमेरिकेतील अनेक लोककथांमध्ये या कराकरा पक्ष्याला मेक्सिकन गरुड- [Mexican eagle] असे म्हणतात. दक्षिण अमेरिकेतील बहुतांश देशात हा पक्षी आढळतो. हा पक्षी कीटक, बेडूक, मासे, अळ्या,सरपटणारी प्राणी, पक्ष्यांची अंडी असे विविध प्रकारचे अन्न खाऊन आपला उदरनिर्वाह करीत असतो.

Amazon Rainforest : king Vulture: राजा गिधाड

Leave a comment