Amazon Rainforest : king Vulture: राजा गिधाड

गिधाड हा कसा पक्षी आहे की त्याला सफाई कामगार अस म्हटले जाते. मेलेल्या प्राण्यांचे मांस खाऊन गुजराण करणारा हा पक्षी आहे.मृत प्राण्यांचे मांस खाल्ल्यामुळे ही गिधाडे आजूबाजूला पसरणारी दुर्गंधी रोखतात.दक्षिण अमेरिकेत आढळणारा सर्वांत मोठा आणि आकाशात उड‌‌णारा पक्षी म्हणजे king Vulture होय. Amazon rainforest मध्ये प्रामुख्याने हा पक्षी आढळतो. त्याचे विशाल आणि मजबूत पंख हे king vulture चे खास वैशिष्ट्य आहे. हा एक उष्ण कटिबंधीय प्रदेशात राहणारा पक्षी असून मेक्सिको ते अर्जेटिना या पट्टय़ात आढळतो. दक्षिण अमेरिकेत पांढऱ्या रंगाची गिधाडे आहेत. त्यांची शेपटी राखाडी रंगाची किंवा काळा रंगाची असते. पाठीवर त्याच रंगाचे ठिपके असतात. या राजा गिधाडांचे आणची एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या मानेवरती आणि डोक्यावर पिसे नसतात. त्याच्या टोचीवर नारिंगी रंगाचे मांसल कोटिंग असते. हा पक्षी 70 ते 80 सेमी लांब असतो. त्यांच्या पंखाच्या दोन्ही टोकांमधली लांबी 1.5 ते 2 मीटर असते .पूर्ण वाढ झालेल्या गिधाडाचे वजन 3.5 ते 5 किलोग्रॅम असते. भारतातील गिधाडांची संख्या सपाट्याने कमी होत चालली आहे. एक दिवस डोडोसारखा हा गिधाड पक्षी सुद्धा नष्ट होईल की काय, असे वाटते. आजारपणात इंजेक्शन आणि सलाईन दिलेल्या मृत जनावरांचे मांस खाऊन त्याची ॲलर्जी होऊन भारतातील गिधाडे मरत आहेत.

Amazon Rainforest :Harpy Eagle

Leave a comment