आपण प्रथम हवेची गुणवत्ता पातळी (AQI) म्हणजे काय पाहूया .हवेची गुणवत्ता आणि दर्जा हा मानवी व्यवहारावर अवलंबून असतो. माणूसच निसर्गाचा प्रथम क्रमांकाचा शत्रू आहे. त्यामुळे त्याचे परिणामही माणसालाच भोगावे लागणार आहेत. किंबहुना भोगावे लागत आहेत. 20 नोव्हेंबर 2024 ची दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेची पातळी 488 च्या वर गेलेली आहे. ही पातळी धोक्याच्या पातळीच्या कितीतरी पटीने अधिक आहे. अशा हवेत काही दिवस थांबणे सुद्धा धोक्याचे आहे. दिल्लीकरांना तर अख्खे दिल्लीतच आयुष्य काढावे लागत आहे. दिल्लीत भविष्यात फुफ्फुसाच्या कॅन्सरचे आणि दम्याचे हजारो रुग्ण आढळतील. या रुग्णांना दिल्लीत हॉस्पिटल्स कमी पडतील,हे प्रांजळपणे कबूल करायला हवे. टीचभर पोटासाठी लोकांना शहरात राहावे लागते. मग हे लोक प्रदूषणाच्या विळख्यात सापडतात. साहजिकच आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम करून घेतात. आपण हवेची गुणवत्ता पातळी म्हणजे काय पाहूया.या पातळीचे टप्पे कोणते आहेत? हेही पाहू. नागरी वस्तीत म्हणजेच दिल्ली, मुंबई, चेन्नई कोलकाता या शहरांतील हवेच्या प्रदूषणाची पातळी का वाढत आहे? हेही पाहू
हवेची गुणवत्ता/प्रदूषण पातळी म्हणजे काय ? What is meaning of Air Quality/Pollution Index?
हवेची गुणवता म्हणजे हवेत असलेल्या प्रदूषकाचे प्रमाण होय. प्रदूषकाचे प्रमाण जितके कमी तितकी हवेची गुणवत्ता अधिक चांगली असते. हवेतील प्रदूषकाचे प्रमाण जितके जास्त तितकी हवेची गुणवत्ता खराब झालेली असते. म्हणून महत्त्वाच्या आणि मोठमोठ्या शहरातील हवेची गुणवत्ता पातळी तपासली जाते. यालाच हवेची प्रदूषण पातळी असेही म्हणतात.
हवेच्या गुणवत्ता स्थितीचे टप्पे – Steps of AQI
1) पहिला टप्पा [First step] : Green step
ज्या ठिकाणी हवेच्या गुणवत्तेची पातळी 0 ते 50 प्रदूषकांपर्यंत असते ,अशा ठिकाणच्या हवेची गुणवत्ता अतिशय उत्तम मानली जाते. येथील हवा चांगली, आरोग्यदायक समजली जाते. या हवेपासून आरोग्यास अजिबात धोका नसतो. अशी हवा असलेल्या ठिकाणाला हिरव्या रंगाने Marking करतात. डोंगर, थंड हवेची ठिकाणे, जंगल , डोंगर कपारी आणि वर्दळीपासून दूर असलेली गावे हिरव्या टप्प्यात येतात.
2) दुसरा टप्पा [Second step] Yellow step.
ज्या ठिकाणी हवेच्या गुणवत्तेची पातळी 51 ते 100 प्रदूषकांपर्यंत असते, ते ठिकाण सुरक्षेच्या दृष्टीने मध्यम मानले जाते. ही ठिकाणे पिवळ्या रंगाने निर्देशित करून दाखवतात. पिवळ्या पट्टयातील गावे किंवा ठिकाणे हवेपासून कमी धोकादायक असतात. अत्यंत कमकुवत किंवा आजारी असलेल्या रुग्णांसाठी अशी हवा किंचित धोकादायक असते.
3) तिसरा टप्पा -Third Step-Orange step
तिसऱ्या टप्प्यात म्हणजे orange पट्ट्यात असलेल्या ठिकाणे, गावे, शहरे संवेदनशील मानली जातात. येथील हवेची गुणवत्ता पातळी म्हणजेच प्रदूषक पातळी 101 ते 150 असते. अशी हवा निरोगी माणसाला अजिबात धोकादायक नसते. वृद्ध माणसे, लहान मुले यांचे आरोग्य नारिंगी पट्टयात बिघडू शकते. या ठिकाणी आरोग्याची काळजी घ्यावी लागते.
4) चौथा टप्पा – Fourth Step- Red Step
हवेच्या गुणवत्तेचे जे सहा टप्पे पडतात. त्यांतील चौथा, पाचवा आणि सहावा हे तीन टप्पे धोकादायक पट्टे समजले जातात. चौथ्या टप्प्याच्या वरील हवेच्या गुणवत्तेची पातळी 151 ते 200 च्या दरम्यान असते. या हवेत प्रदूषकांचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे येथील हवा धोकादायक मानली जाते. या हवेला लाल पट्टयाने निर्देशित केले जाते. येथील हवा आजारी माणसांना धोकादायक आहेच. त्याचबरोबर निरोगी माणसालाही फुफ्फुसाचे आजार होऊ शकतात.
5) पाचवा टप्पा-Fifth Step-Purple step
हवेच्या गुणवत्तेची पातळी तपासताना पाचव्या आणि सहाव्या टप्यातील हवा प्रदूषके पाहिल्यास या ठिकाणांनी धोक्याची पातळी ओलांडलेली दिसून येईल. पाचव्या टप्प्यातील हवेच्या गुणवत्तेची पातळी 201 ते 300 पर्यंत असते. ही High Level Pollution step मानली जाते. ही प्रदूषण पातळी असलेली ठिकाणे जांभळ्या रंगाने दाखवलेली असते. सुदृढ माणसालाही डोळ्यांचे, त्वचेचे, फुफ्फुसांचे अनेक प्रकारचे आजार होतात.
6) सहावा टप्पा- Sixth step – maroon step:
हवेच्या गुणवत्तेच्या पातळीचा सहावा टप्पा म्हणजे अत्यंत घातक टप्पा होय. हा टप्पा maroon colour ने निर्देशित केला असून येथील प्रदूषण पातळी 301 च्या पुढे असते. येथील प्रदूषण Very High Level Pollution step मध्ये असते. सध्या दिल्ली हे शहर सहाव्या टप्प्यात येत असून भारतात सर्वांत जास्त प्रदूषण पातळी दिल्लीची खालावलेली आहे. सध्या म्हणजे 20 नोव्हेंबर 2024 मध्ये दिल्लीची प्रदूषण पातळी 488 च्या वर गेलेली आहे. ही भारतात नोंदलेली सर्वोच्च पातळी आहे. येथील सर्वच लोकांचे आरोग्य धोकादायक असते. फुफ्फुसाचे कॅन्सर होण्याचे प्रमाण या शहरात सर्वात अधिक असते.
अशा प्रकारे Green, Yellow, Orange, Red, Purple, maroon रंगांनी प्रदूषण पातळीचे टप्पे दाखवले जातात.