फळांनी बहरलेल्या वनस्पती असतात. तशा फुलांनी बहरलेल्या वनस्पतीही असतात. वनस्पतींमध्ये सुद्धा भरपूर जैवविविधता असते. दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest तर जैवविविधतेच्या बाबतीत जगातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. भारतात आढळणाऱ्या हिरडा’ या फळासारखे फळ लागणारी वनस्पती ॲमेझॉनच्या जंगलात आढळते. ती वनस्पती म्हणजे cacao होय. कॅकाओ ही अमेझॉनच्या जंगलातील वनस्पती औषधी वनस्पती आहे. या फळाची पावडर करून विक्री केली जाते. ही पापडर शक्तीवर्धक, कोलेस्टेरॉल कमी करणारी, हृदयविकारावर गुणकारी अशी आहे. म्हणूनच या पावडरीला जगात मोठी मागणी आहे. कॅकाओ फळांच्या पावडरीचा उपयोग चॉकलेट्स बनवण्यासाठी सुद्धा केला जातो. अशी चॉकलेट्स ही रोगप्रतिबंधात्मक आणि उत्साहवर्धक असतात. या फळात भरपूर लोहकण असतात. म्हणूनच ते आरोग्यवर्धक आहे.तुम्ही जे dark chocolate खाता, त्यात 75% कॅकाओ असते. यावरुन कॅकाओचे महत्त्व तुमच्या लक्षात येईल. उष्णकटिबंधीय प्रदेशात आणि सदाहरित वनात कॅकाओ वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळते. गयाना, युक्रेन देशांत मोठ्या प्रमाणात कॅकाओ आढळते. फिलिपाईन्समधील पर्वतीय प्रदेशात मारिया कॅकाओ ही वनस्पती आढळते.