AI Technology and deep fake :AI आणि डीप फेक 

AI म्हणजेच Artificial Intelligence होय. यालाच कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. सध्या AI तंत्रज्ञानाने सर्वच क्षेत्रात शिरकाव केलेला आहे. AI ची उपयुक्तता अनन्यसाधारण आहे. AI तंत्रज्ञान हे काळाला पुढे घेऊन जाणारे तंत्रज्ञान आहे. भविष्यात AI तंत्रज्ञान अपरिहार्य होऊन बसणार आहे.

आपल्या म्हणजे मानवी बु‌द्धिमत्तेप्रमाणे किंबहुना त्याहून अधिक चांगल्या प्रकारे काम करणारे software निर्माण करणे म्हणजेच AI होय. ही कृत्रिम बुद्धिमत्ता मानवच निर्माण करतो आणि कधीकधी या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करणाराही मानवच असतो. मानवी जीवनाला वरदान ठरणारे AI हे तंत्रज्ञान भविष्यात शाप ठरु नये, यासाठी सतत जागरूक राहणे आवश्यक आहे.

AI तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून डीप फेक करण्याचे प्रकार अलीकडे वाढत आहे. AI तंत्रज्ञानाने केलेली प्रगती कौतुकास्पद आहे; पण त्याच बरोबर डीपफेक ची लागलेली कीड मुळासकट उपटून टाकणे हे खूप महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञानाच्या जोरावर माणूस चंद्रावरच का मंगळावर सु‌द्धा जाईल; पण विध्नसंतुष्ट लोक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून अनेकांचे स्वास्थ्य बिघडवणार आहेत. हा प्रश्न केवळ राष्ट्रीय पातळीवरचा राहिलेला नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर नजीकच्या काळात सर्वात अधिक प्रमाणात भेडसावणारा हा प्रश्न आहे.

डीप फेक म्हणजे काय ? 

डीप फेक म्हणजे बनावट घटनांच्या प्रतिमा, व्हिडिओ, ऑडिओ, बनावट सामग्री तयार करणे होय.

डीप फेकचा फटका सर्वाधिक राजकीय प्रतिमा मलीन करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. AI तंत्रज्ञानाचा सर्वांत जास्त फटका राजकीय व्यक्तींना बसणार आहे. प्रसिद्ध राजकीय व्यक्तींबरोबरच सिनेकलाकार, विविध टीव्ही मालिकांमध्ये काम करणारे कलाकार, सामाजिक क्षेत्रातील प्रसि‌द्ध व्यक्ती, प्रशासकीय क्षेत्रातील अधिकारी, व्यापार, उद्योगातील नामांकित व्यक्ती, कारखानदार, मॉडेलिंग करणाऱ्या व्यक्ती, नामांकित गायक, लेखक, विविध राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष, लष्करप्रमुख गुप्तचर यंत्रणांतील प्रमुख अशा अनेक क्षेत्रात डीपफेक चा त्रास होणार आहे.

डीपफेक वर उपाय काय ?

डीपफेक करणाऱ्या व्यक्तींचा नजीकच्या काळात सुळसुळाट होणार आहे. एखाद्याला blackmail करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डीपफेकचा वापर होणार आहे. म्हणूनच त्यावर कठोर उपाययोजना करणासाठी कायदेशीर तरतूद करणे आवश्यक आहे. कायदा मजबूत असेल आणि अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्तींनी कठोर कारवाई‌चो बडगा उघडल्यास डीपफेक ला आळा बसेल

AI तंत्रज्ञानाचा वापर कधीच बंद होणार नाही. उलट हे तंत्रज्ञान वाढतच राहणार . म्हणून AI चा गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करणे हाच त्यावर चांगला उपाय आहे.

Leave a comment