तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी झेप म्हणजे AI चे तंत्रज्ञान होय. AI ने सध्या संपूर्ण जग व्यापलेले आहे. प्रत्येक क्षेत्रात क्रांतिकारी बदल होत आहेत. तरीही AI अजूनही बाल्यावस्थेत आहे असे म्हणता येईल. AI ला भविष्यात अजून खूप मोठी झेप घ्यायची आहे. सध्या अनेक शास्त्रज्ञ या क्षेत्रात वेगवेगळे संशोधन करत आहेत. 2024 चा संशोधन क्षेत्रातील नोबेल पारितोषिक AI च्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या दोन उमद्या शास्त्रज्ञांना मिळाले आहेत.यावरून AI ला किती महत्त्व आहे ते लक्षात आले असेल.
भारतीय शास्त्रज्ञ मुनीर खान (Munir khan) याने या AI च्या क्षेत्रात आश्चर्यकारक शोध लावला आहे. AI चे तंत्रज्ञान वापरून त्याने असा चष्मा बनवला आहे की त्याचा उपयोग दृष्टिहीन लोकांना भरपूर फायदा होईल.
आपली दृष्टी गेल्यामुळे अंधकारमय आयुष्य जगणाऱ्या जगातील लाखो अंध व्यक्तींना आणि जन्मजात अंध व्यतीला जग पाहता येईल, असा आशेचा किरण मुनीर खान या नवख्या शास्त्रज्ञाने निर्माण केला आहे. Cadre Technologies Services Limited असे या Start up चे नाव असून 28 वर्षीय मुनीर खानने आपल्या संशोधनाला पेटंट मिळण्यासाठी भारत सरकारकडे अर्ज केला आहे. कदाचित 16/17 डिसेंबर 2024 मध्ये IIT मुंबई येथे या चष्म्याचे अनावरण होणार असल्याचे समजते. मुनीर खान हे हार्वर्ड विद्यापीठात सेंसर यंत्रणेवर संशोधन करीत आहेत. विशेष म्हणजे त्याने बनवलेल्या चष्म्याच्या प्रोटोटाईपला अमेरिकेच्या FDA ने मंजुरी दिली आहे.
AI चष्म्याचा वापर कसा करायचा? How to use AI Spectacles?
1 मुनीर खान यांनी बनवलेला चष्मा एकदा चार्ज केला की 12 तास वापरता येतो . म्हणजे दिवसभर हा चष्मा वापरून रात्री चार्ज करता येतो.
2 या चष्म्याच्या साहाय्याने 100 मीटर अंतरावरील वस्तू किंवा व्यक्ती सेन्सरच्या साहाय्याने पाहता येईल. भविष्यात या क्षेत्रात आणखी क्रांतिकारक संशोधन झाले तर ती व्यक्ती कोण आहे. हे सुद्धा ओळखता येईल, असा मुनीर खान यांचा दावा आहे.
AI चष्मा कसा काम करेल? How to work AI Spectacles ?
दृष्टीहीन लोकांसाठी हा चष्मा वरदान ठरणार आहे.
हा चष्मा डेटा बेस तयार करत राहणार असून चष्मा लावल्यानंतर त्या व्यक्तीने ज्या वस्तू पाहिल्या आहेत, ज्या व्यक्ती पाहिल्या आहेत, जे ठिकाण पाहिले आहे, ते ते सर्व कायम स्वरुपी संग्रहित राहणार आहे. त्यामुळे पुन्हा तीच व्यक्ती समोर आल्यावर अंध व्यक्तीला सेंसरच्या साहाय्याने ओळखायला मदत होणार आहे.
2 हा चष्मा परिधान करणाऱ्या व्यक्तीला अडथळ्याची जाणीव होणार आहे. ताटात कोणते अन्न आहे हेही ओळखता येईल. औषधांमधील फरकही ओळखता येईल. अचानक आलेला अडथळा ओळखण्यासाठी सिग्नल बेलही (alert) वाजेल.
3 AI चा चष्मा घातल्यानंतर अंधार, उजेड यांतील फरकही जाणवेल. विविध आवाज सुद्धा संग्रहित करता येणार असून भविष्यात कर्णबधिर लोकांनाही या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना चांगले ऐकू सुद्धा येईल.