तुम्हाला सूर्यनमस्काराच्या Poses म्हणजे कृती किंवा Steps माहीत आहेत का? कसा घालायचा उत्तम सूर्यनमस्कार ? त्याचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काय महत्त्व आहे ? शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी सूर्यनमस्कार एक उत्तम व्यायामप्रकार मानला जातो. या सूर्य नमस्काराच्या बारा Poses [कृती] आहेत. या सर्व कृती आपण समजून घेऊया.
Pose 1: Prayer Position: प्रार्थना स्थिती
या Position मध्ये सरळ, ताठ उभे राहायचे; पण कोणत्याही अवयवावर ताण येणार नाही याची काळजी घ्यायची. छाती पुढे काढलेली हवी. श्वास घेऊन दोन्ही हात वर उचलायचे, श्वास सोडून छाती समोर हात जुळवून प्रार्थना स्थितीत उभे राहायचे.ही सूर्यनमस्काराची पहिली step आहे.
Pose 2: Raised Arms Pose: हस्तउत्तनासन (हात उंचावणे)
हस्तउत्तनासन किंवा हात उंचावणे ही सूर्य नमस्काराची दुसरी Position आहे. श्वास घेत हात उंचावून मागे न्यायचे. पोट किंवा कंबर पुढे न काढता छाती पुढे आली पाहिजे. श्वास स्थिर ठेवून संपूर्ण शरीर ताणले गेले पाहिजे.
Pose 3: Hand to Foot pose: हस्त पदासन
हस्त पदासन ही सूर्य नमस्काराची तिसरी Position आहे. हस्तउत्तनासन स्थितीतून श्वास सोडत पाय ताठ ठेवत हात खाली जमिनीवर टेकवावे . या स्थितीत वाकून आपले कपाळ गुडघ्यांना लावायचा प्रयत्न करायचा. या स्थितीत असताना गुडघे वाकवायचे नाहीत.
Pose 4: Equestrian Pose: अश्व संचलनासन
या Position मध्ये आपल्या शरीराची स्थिती घोड्यासारखी असते. म्हणूनच या स्थितीला अश्व संचलनासन असे म्हणतात. या स्थितीत श्वास घेऊन रोखून ठेवून आपला उजवा पाय शक्य तितका मागे खेचावा. डावा पाय दोन्ही हाताच्या मध्ये गुडघ्यात वाकवून हळूहळू वरच्या दिशेला पाहावे.
Pose 5: Stick Pose: दंडासन
या आसनात श्वास आत घेऊन रोखून ठेवावा. आपल्या शरीरामुळे जमिनीशी त्रिकोण तयार होईल अशी का Postiton असायला हवी. पाठीवरून चेंडू सोडला तर तो गरंगळत पायाकडे गेला पाहिजे. शरीर एका सरळ रेषेत हवे.
Pose 6: Salute with eight parts: अष्टांग नमस्कार
पाचव्या Pose मध्ये घेतलेला श्वास या आसनाच्या सुरुवातीला सोडावा. दोन्ही पाय मागे जुळलेले हवेत. या आसनात दोन हात खांद्यांजवळ जमिनीवर टेकलेले हवेत. शरीराचा सहन होईल तसा भार दोन्ही हातांवर पेलेल असा टाकावा. छाती, कपाळ, गुडघे जमिनीला टेकलेले असावे. कमरेचा भाग नकळत वरच्या बाजूला उचलेला असावा. संपूर्ण शरीर सरळ रेषेत असेल याची काळजी घ्यावी.
Pose 7: Cobra Pose: भुजंगासन
या आसनाच्या सुरुवातीला श्वास घेऊन रोखून ठेवायचा. आपल्या शरीराचा पुढील भार दोन्ही हातावर ठेवून कमरेपासून पुढचा भाग वर उचलून कोब्रा जसा फणा काढून उभा राहतो, त्याच Position मध्ये शरीराचा पुढचा भाग वर उचलून वरच्या दिशेला पाहायचे. आपली स्थिती कोब्रा सारखी दिसते.
Pose 8: Hill pose: पर्वतीय मुद्रा
भुजंगासनमध्ये रोखून ठेवलेला श्वास पर्वतासनाच्या सुरुवातीला सोडायचा. आपले पाय ताठ ठेवायचे. हात ताठ ठेवायचे आणि कमरेचा भाग वर उचलायचा डोके खाली हवे. आपल्या शरीराचा आकार टेकटीसारखा किंवा पर्वतासारखा दिसला पाहिजे.
Pose 9. Equestrian Pose: अश्वारूढ मुद्रा
आपली स्थिती Position 4 मध्ये जशी होती, तशीच असायला हवी. या आसनाच्या सुरुवातीच्या वेळी श्वास आत घेऊन रोखून ठेवायचा
या आसनाच्या वेळी डावा पाय जमिनीकडे खेचायचा.आणि उजवा पाय गुडघ्यात वाकवून घोड्यासारखी स्थिती ठेवत आकाशाकडे पाहायचे. शरीराचा संपूर्ण भार दुमडलेल्या पायावर आणि दोन्ही हातावर असायला हवा.
Pose 10:Hand to Foot :हस्तपदासन
या आसनात Position 3 प्रमाणे पुन्हा कृती करायची. या Position मध्ये घेतलेला श्वास सोडायचा आणि दस्तपदासन करायचे. गुडघे ताठ हवेत. दोन्ही हाताचे तळवे जमिनीवर ठेवलेले असावेत आणि आपले कपाळ गुडघ्यांना लावायचा प्रयत्न करायचा.
Pose 11: Raised Arms pose: हस्तउत्तनासन
Position 2 प्रमाणे हस्त उत्तानासन करताना श्वास घ्यायचा आणि या आसनाच्या अंतिम टप्प्यात काही क्षण श्वास रोखायचा.
Pose 12: Prayer pose: प्रार्थना स्थिती
हस्तपदासन स्थितीतून हळूहळू प्रार्थना मुद्रेत येताना श्वास घ्यायचा. Position एक प्रमाणे आपल्या शरीराची स्थिती ठेवायची .आपले शरीर ताठ असावे. दोन्ही हात नमस्कारासाठी जुळलेले असावेत . हे आसन संपताच श्वास सोडावा. या Position नंतर एक सूर्यनमस्कार पूर्ण होतो. आपल्या वयोमानानुसार 24 ते 120 पर्यंतसूर्यनमस्कार घालावेत. सूर्यनमस्कारात सातत्य असेल तर तुम्हाला सूर्यनमस्काराचे अनेक फायदे दिसून येतील.