सध्याच्या Digital Media च्या युगात वाचन संस्कृती हरवत चालली आहे. नव्या पिढीला आणि तरुण पिढीला वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी काळाच्या बरोबर चालण्यासाठी Digital Reading च्या माध्यमातून आपले साहित्य, आपल्या संस्कृतीचा इतिहास AI सारख्या प्रभावी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर ठेवला पाहिजे. सध्याची पिढी Reals आणि डिजिटल मिडियाच्या माध्यमातून आलेल्या माहितीच्या आधारे एखाद्या घटनेवर, प्रसंगावर, इतिहासावर आपले मत बनवत आहे. समोर दिसते ते खरे-खोटे करण्याची क्षमता त्यांच्यात नसते. त्यामुळे भारतीय संस्कृतीचा खरा इतिहास नव्या पिढीला कळण्यासाठी आ. ह. साळुंखे, जयसिंगराव पवार, इंद्रजित सावंत यांच्यासारख्या इतिहासकारांची पुस्तके डिजिटल स्वरुपात मिडियात आलीत, तर निश्चितच नवी पिढी जागरुक आणि सुज्ञ होईल.
