Birth right Citizenship: Court Blows Trump :जन्माने नागरिकत्व : ट्रम्प यांना न्यायालयाचा धक्का

डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी 2025 राजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच जन्माने अमेरिकेच्या नागरिकत्वाचा अधिकार रद्द केला होता. अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार ज्या व्यक्तीचा जन्म अमेरिकेत झाला आहे, तिला आपोआपच अमेरिकन नागरिकत्व मिळत असे. सुमारे दीडशे वर्षापासून हा अमेरिकन नागरिकत्वाचा अधिकार अमेरिकेत लागू होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणानुसार त्यांनी परिदेशी नागरिकांची मुले अमेरिकेत जन्मली तरी त्यांना अमेरिकन नागरिकत्व मिळणार नाही, असा अद्यादेश काढून त्यावर सही सुद्धा केली होती. सध्या अमेरिकेत अनेक परदेशी लोकांबरोबरच सुमारे 50 लाख भारतीय लोक अमेरिकेत राहतात. हे सर्व लोक डोनाल्ड ट्रंप यांच्या निर्णयाने धास्तावलेले आहेत. 31 मार्च 2025 नंतर जन्मलेले कोणतेही परदेशी नागरिकाचे बाळ अमेरिकेचे नागरिक असण्यास पात्र असणार नाही, असा तो निर्णय होती.त्यामुळे अनेक गरोदर मातांच्या लवकर बाळंतपण होण्यासाठी दवाखान्यात रांगा लागल्या आहेत.

वास्तविक अमेरिका हा स्थलांतरितांचा देश आहे. कमी लोकसंख्या आणि प्रचंड विस्तार असल्याने परदेशी नागरिकांना अमेरिकेत वास्तव्य करण्यासाठी आणि कायमचे नागरिकत्व मिळण्यासाठी जन्माने अमेरिकन असलेल्या व्यक्तीला दीडशे वर्षांपासून अमेरिकन नागरिकत्व दिले जात असे, पण ट्रम्प यांच्या निर्णयाने अनेक परदेशी नागरिक धास्तावलेले आहेत.

ट्रम्प यांच्या निर्णयाला न्यायालयाचा धक्का :Court shocks Trump’s decision

जन्माने अमेरिकन असलेल्या व्यक्तीला दिला गेलेला अमेरिकन नागरिकत्वाचा अधिकार ट्रम्प यांनी रद्द‌ केला होता. या निर्णयाला अमेरिकन संघीय न्यायालयाने स्थगिती देऊन ट्रम्प यांना धक्का दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने लाखो परदेशी नागरिकांना मात्र दिलासा दिला आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात भारतीय लोक असल्याने या तमाम भारतीयांना काही काळ तरी दिलासा मिळाला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी नागरिक त्वासंदर्भात दिलेला आदेश म्हणजे अमेरिकन संविधानाच्या 14 व्या दुरुस्तीतील नागरी अधिकारांचे उल्लंघन असल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला होता. असा अधिकार रद्द करण्याचा घटनात्मक अधिकार अमेरिकन संसदेला किंवा राष्ट्राध्यक्षांना नसल्याचा दावा याचिकेत केला आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे मान्य करून ट्रम्प यांच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच एक आठवडा पूर्ण होण्यापूर्वीच न्यायालयाने त्यांच्या निर्णयाला स्थगिती देऊन ट्रम्प यांना चांगलेच तोंडघशी पाडले आहे.

Leave a comment