AI चा वापर जॉब शोधण्यासाठी?

सध्या भारतात मोठ्या प्रमाणात बेकारी वाढत आहे. वेगवेगळया क्षेत्रावरील रिक्त पदांची संख्या, उद्योग, कार‌खानदारीत होत असलेली तेजी-मंदी यांमुळे बेकारीची संख्या झपाट्याने वाढत आहे. फुकटच्या योजनांमुळे आर्थिक कणा मोडून पडला आहे. भारतावर आणि महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा वाढतच आहे. आर्थिक मंदीच्या शक्यतेमुळे परदेशी गुंतवणुकदार सावध आहेत. अशा वेळी नोकऱ्या शोधायच्या कुठे ? हा मोठा प्रश्न आजच्या तरुणांसमोर उभा ठाकलेला आहे.

नोकरी शोधणारे तरुण सध्याच्या बदलत्या काळानुसार नव्या नव्या जॉबचा शोध घेण्यासाठी आणि त्यासाठी लागणारा बायोडाटा तयार करण्याराठी AI तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरु झाल्याचे आढळत आहे.

सध्या भारतात नोकरी शोधणारे 87% लोक जॉब शोधण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. आपले कौशल्य अधिक चांगल्याप्रकारे दाखवण्यासाठी पोर्टफोलिओ आणि व्हिज्युअल्स इंटरॅक्टिव्ह रेज्युमेचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. 95% हायरिंग मॅनेजर्स हे मान्य करतात की AI च्या वापरामुळे उमेदवारांच्या एक पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभपणे करता येऊ लागली आहे.

2024 मध्ये तरुणांनी आणि व्यावसायिकांनी नोकरीच्या संधी वाढवण्यासाठी कॅनव्हा वर 39 कोटीपेक्षा जास्त रेझ्युमे तयार केले आहेत. 2025 मध्ये हा आकडा दुपटीने, तिपटीने वाढू शकतो.

अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया ब्राझील, मेक्सिको, भारत या देशांतील 4200 हायरिंग मॅनेजर्स साठी 6000 नोकरी शोधणारे उमेदवार यांची मते जाणून घेण्यात आली. त्यानुसार—

87% भारतीय नोकरीसाठी रेझ्युमे बनवणे, अपडेट इत्यादीसाठी AI चा वापर करतात.

83% मॅनेजर्स डिजिटल पोर्टफोलिओला प्राधान्य दिला आहे.

80% उमेद‌वारांनी आपला वेळ वाचवण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

79% हायरिंग मॅनेजर्स Text आधारित रेझ्युमेला जुन्या पद्‌धतीने मानत आहेत.

77% हायरिंग मॅनेजर्स नोकरीसाठी उमेद‌वारांची निवड करताना AI तंत्रज्ञानाची मदत घेतल्याचे दिसून आले.

76% नोकरी शोधणारे उमेद्‌वार, AI च्या वापरामुळे अधिक कल्पक वाटले.

63% भारतीय उत्तर देशांच्या तुलनेत AI च्या मदतीने आपल्या आलेल्या रेझ्युमेमध्ये वारंवार बदल करत असल्याचे आढळून थोडक्यात AI तंत्रज्ञान हेच                      नोकरीसाठी आशास्थान राहिले आहे.

Leave a comment