सध्या भारतातील प्रयागराज जेथे 13 आनेवारी 2025 पासून मकर संक्रातीच्या पूर्वसंध्येला महाकुंभमेळा सुरू झाला आहे. या मेळ्याला चित्र-विचित्र साधू , तमाम भारतातील भाविक (की अंधभक्त?)दररोज येत आहेत. आणि पवित्र स्नानाच्या नावाखाली गंगेचे शुद्धपाणी अशुद्ध करत आहेत. खरे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक येतात की आतापर्यंत 12 ते 15 कोटी लोकांनी हजेरी लावली आहे.
या महाकुंभात आग लागणे, अपघात होणे, गुदमरून मरणे असे प्रकार रोज घडतच आहेत. बुधवार दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी तर झालेल्या चंगराचेंगरीत 30 हून अधिक लोक मयत झाले आहेत, तर 70 हून अधिक लोक गंभीर जखमी, झाले आहेत.
प्रयागराज येथे गंगा नदीच्या काठी ‘संगमनेज’ या ठिकाणी बुधवारी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. या घटनेची अनेक ठिकाणी तीव्र प्रतिक्रिया उमटत असून उत्तर प्रदेश आणि भारत सरकारच्या गचाळ नियोजनावर भाविक कडाडून हल्ला करत आहेत. तर काहीजण या घटनेकडे ही तर गंगेचीच इच्छा!
असे पाहात आहेत. विवेकशून्य जनसमुदाय एकत्र आल्यावर यापेक्षा दुसरे काय घडणार?
भारतीयांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकशीलता शाबूत ठेवून आचरण केल्यास अशा पद्धतीने मेंढरांसारखे कळपाने एकत्र येणार नाहीत.
तीर्थी धोंडापाणी ।। देव रोकडा सज्जनी ॥
हे संत तुकाराम यांचे ब्रीद नेहमी लक्षात ठेवावे.