AI म्हणजेच Artificial Intelligence हे तुम्हाला माहीत आहेच. AI तंत्रज्ञानाचा शिक्षण, उद्योग, व्यवसाय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. यांत आरोग्य क्षेत्रही मागे नाही. झटपट आणि जलद निदान होण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर आता वाढू लागला आहे.
कोणत्याही रोगाचे निदान होण्यासाठी एक्स-रे, स्कॅन, MRI, इको टेस्ट, कार्डिओग्राफ, विविध रक्ताच्या चाचण्या, सोनोग्राफी इत्यादी तंत्रांचा वापर केला जातो. या तंत्रांद्वारे बेतलेल्या चाचण्यांनुसार रोगाचे निदान लागण्यासारी अर्धा दिवस ते एक आठवडा इतका वेळ लागू शकतो. आता या तंत्रज्ञानाच्या जोडीला AI तंत्रज्ञान आले तर डॉक्टरांच्या हातात आपला रिपोर्ट अहवाल पोचण्यापूर्वीच AI तंत्रज्ञान अचूक निदान काढून सविस्तर माहिती देते.
सध्या छत्रपती संभाजीनगर शासकीय दंत महाविद्यालयात एक्स-रे विथ AI [X-Ray with AI Technology] मशिन द्वारे रुग्णांची दंतचिकित्सा केली जाते. त्यामुळे AI Doctor झटपट आणि अचूक निदान करून आपला अहवाल डॉक्टरांकडे देतो. या झटपट आणि अचूक निदानामुळे डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करणे सोपे जात आहे.
आता भाविष्यात याच तंत्रज्ञानाचा वापर सोनोग्राफी विथ AI, Eco test with AI, Blood test with AI, Cardiograph with AI, MRI with AI असे तंत्रज्ञान विकसित होऊन आरोग्य क्षेत्रात क्रांती होणार आहे. त्यामुळे रुग्णांवर जलद उपचार होण्यासाठी मदत होणार आहे. ही बाब रुग्णांसाठी आनंददायी आहे.