भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रेरणेतून आणि पायाभरणीतून भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 15 ऑगस्ट 1969 रोजी ISRO ची स्थापना केली. तत्कालीन वैज्ञानिक आणि ISRO चे अध्यक्ष विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली ISRO च्या गतिमान कार्याला सुरुवात झाली होती.
ISRO ने बुधवार दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी पहाटेच्या वेळी 100 व्या मोहिमेंतर्गत अत्याधुनिक अशा नेव्हिगेशन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. ISRO चे विद्यमान अध्यक्ष व्ही. नारायणन् यांच्या नेतृत्वाखालील ही पहिलीच मोहीम होती. त्यामुळे भारताचेच काय संपूर्ण जगाचे लक्ष या मोहिमेकडे होते. ISRO ने 2025 सालात तमाम भारतीयांना 100 वा उपग्रह अंतराळात सोडून आनंदाची आणि विश्वासाची पर्वणीच दिली.
21 नोव्हेंबर 1963 रोजी तिरुअनंतपुरमच्या जवळच थुंबा येथून भारताचे पहिले अंतराळयान सोडले होते. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने 1962 साली भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्था स्थापन केली .त्यावेळी विक्रम साराभाई हे या संस्थेचे अध्यक्ष होते. त्यानंतर पुढे इंदिरा गांधी यांनी या संस्थेचे रुपांतर ISRO मध्ये 15 ऑगस्ट 1969 रोजी केले. आज इस्रोने गरुडझेप घेऊन 100 वे अंतराळयान अवकाशात सोडून अंतरिक्ष क्षेत्रात क्रांती घडवली.