साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
जॉन मॅक्सवेल कोट्झी
John Maxwell Coetzee
जन्म : 9 फेब्रुवारी 1940
मृत्यू :
राष्ट्रीयत्व : दक्षिण आफ्रिकन
पुरस्कार वर्ष: 2003
जॉन मॅक्सवेल कोट्झी हे दक्षिण आफ्रिकेतील श्रेष्ठ कादंबरीकार आहेत. त्यांच्या आत्तापर्यंत आठ-दहा कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांना साहित्याचा बुकर पुरस्कारही मिळाला आहे. वयाच्या त्रेसष्ठाव्या वर्षी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला.