Nobel Peace Prize Winner (Jean Henry Dunant)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते

जीन हेन्री दुनान्त
Jean Henry Dunant
जन्म: 8 मे 1828
मृत्यू : 30 ऑक्टोबर 1910
राष्ट्रीयत्व: स्विस
पुरस्कार वर्ष: 1901
जीन हेन्री दुनान्त यांनी ‘रेड क्रॉस’ ही विश्वव्यापी संघटना स्थापन केली. युद्धाच्या प्रसंगी संकटात सापडलेल्या जखमी झालेल्या लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने ही संस्था जीन यांनी स्थापन केली. याशिवाय कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी धावून येणारी ही स्वयंसेवी संस्था आहे. 1859 च्या इटलीच्या युद्धात जखमी झालेल्या सैनिकांची शुश्रूषा करताना दुनान्त यांना रडक्रॉसची कल्पना सुचली. आज जवळपास 140 हून अधिक देशांत ही संघटना काम करत आहे. हेन्री दुनान्त यांनी केलेल्या निःस्पृह, मानवतावादी, स्वयंस्फूर्त कार्यामुळेच त्यांना शांतीचा पहिला ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला.

Leave a comment