नोबेल शांतता पुरस्कार विजेते
फ्रेड्रिक पासी
Frederic Passy
जन्म: 20 मे 1822
मृत्यू : 12 जून 1912
राष्ट्रीयत्व: फ्रान्स
पुरस्कार वर्ष: 1901
फ्रेड्रिक पासी हे एक अर्थशास्त्रज्ञ होते; परंतु आंतरराष्ट्रीय घडामोडीत मध्यस्थी करण्याची आणि आपापसात चर्चा घडवून समस्येचे निराकरण करण्याचे काम त्यांच्याकडे होते. 1853 ते 56 च्या दरम्यान झालेल्या क्रिमियाच्या युद्धाच्या काळात जागतिक शांती निर्माण होण्यासाठी ते प्रयत्न करू लागले. 1856 नंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जागतिक शांती निर्माण करण्यासाठी खर्च केले. जागतिक शांती प्रस्थापित करण्यासाठी पासी यांनी केलेल्या योगदानासाठी त्यांना 1901 चा नोबल शांती पुरस्कार प्रदान करण्यात आला.