नोबेल शांतता पुरस्कार विजेते
सर विल्यम रेण्डाल क्रेमर
Sir William Randal Cremer
जन्म: 18 मार्च 1828
मृत्यू: 22 जुलै 1908
राष्ट्रीयत्व: ब्रिटिश
पुरस्कार वर्ष: 1903
सर विल्यम रेण्डाल क्रेमर यांचे संपूर्ण जीवन मजुरांच्या कल्याणासाठी आणि रक्षणासाठी खर्च झाले होते. मजुरांच्या हितसंबंधातील सर्व प्रकारचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंटे मिटवण्यासाठी आणि त्यातून योग्य मार्ग काढण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. ते ब्रिटन विभागाचे आंतरराष्ट्रीय मजूर संघाचे सचिव होते. त्यांनी मजूर शांती संघटना स्थापन केली होती. सर विल्यम यांनी मजुरांच्या कल्याणासाठी केलेल्या भरीव कार्यासाठी त्यांना 1903 साली ‘नोबेल शांती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.