Stock Market Crash Predictions 2025- गडगडणारे शेअर मार्केट कधी थांबणार?

शेअर मार्केटमध्ये नेहमीच चढ उतार होत असतात. असे चढ उतार कुणाला फायद्याचे तर कुणाला तोट्याचे ठरत असतात. सध्या अमेरिकन शेअर मार्केट आणि भारतीय शेअर मार्केट प्रचंड प्रमाणात घसरत आहे. जानेवारी 2025 पासून शेअर मार्केट एकसारखे घसरतच आहे. इतक्या प्रचंड प्रमाणात घसरण यापूर्वी 2008 साली झाली होती.

2012 सालापासून शेअर मार्केट एकसारखे वाढत चालले आहे. 2024 साली बाजाराने उच्चतम पातळी गाठल्यामुळे सध्या शेअर मार्केट खाली येत आहे. अर्थात उच्चतम पातळी हे एकमेव कारण नसून अशा अनेक कारणांनी शेअर मार्केट घसरत आहे.

गुंतवणूकदार हबकले

शेअर मार्केटिंग क्षेत्रात सध्या अस्थिरता माजल्यामुळे कधी नव्हे इतक्या प्रचंड प्रमाणात गुंतवणूकदार पॅनिक झाले आहेत. अनेक गुंतवणूकदारांनी घाबरून जाऊन केव्हा पॅनिक होऊन शेअर मार्केट मधून तोटा सहन करून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. काही जणांना आपल्या गुंतवणूकीवर विश्वास नसल्याने शेअर मार्केट मधून त्यांनी उड्या घेतल्या आहेत.

तज्ज्ञांचा सल्ला wait and watch

शेअर मार्केटमधील तज्ज्ञांच्या मते आपण कोणत्याही प्रकारची घाई न करता आहे त्या पोज मध्ये थांबणे हे आपल्या हिताचे आहे किंवा आता सध्या मार्केट डाऊन आहे .अशा डाऊन स्थितीत गुंतवणूक केल्यास आपली बाय पोझिशन खाली येईल आणि शेअर मार्केट सुधारल्यावर आपल्याला नफा होईल असा तज्ञांचा सल्ला आहे. गुंतवणूकदारांनी पॅनिक न होता आपले शेअर विकू नयेत. काही दिवसांनी बाजारात फरक पडेल आणि मार्केट सुधारेल. त्यामुळे घाईघाईत आपले शेअर विकल्यामुळे आपल्याला तोटा होईल. तो तोटा होऊ नये यासाठी गुंतवणूकदारांनी wait and watch करावे.

शेअर मार्केट घसरण्याची कारणे

1 सध्या शेअर मार्केट खूपच घसरले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे गेल्या सात आठ वर्षात शेअर मार्केटमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.

2 मोठे गुंतवणूकदार आहेत, त्यांनी नफ्याच्या काळात प्रचंड नफा मिळवून आपले शेअर विकून टाकले आहेत. त्यामुळेही मार्केटमध्ये पडझड झाली आहे.

3 गेल्या काही वर्षांत अनेक कंपन्यांचे शेअर प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. त्याचा परिणाम म्हणून अशा शेअर मध्ये थोडी घसरण झाली आहे.

4 जागतिक स्तरावर अमेरिका आर्थिक बाबतीत आपले धोरण बदलत आहे. अमेरिकेचे नवीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे केव्हा कोणता निर्णय घेतील याचा कुणालाच अंदाज येऊ शकत नाही, त्यामुळेही त्यांच्या काही निर्णय यांचा फटका शेअर मार्केटला बसलेला आहे.

5 भारतीय अर्थव्यवस्था सध्या अंबानी अदानी अशा बड्या कंपन्यांच्या हातातील बाहुले बनले आहे. त्यामुळे परकीय गुंतवणूकदारांमध्ये विश्वासार्हता राहिलेली नाही. परकीय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक भारतीय शेअर मार्केट मधून काढून घेतली आहे. त्याचा फटका भारतीय शेअर मार्केटला बसलेला आहे. त्यामुळे ही भारतीय शेअर मार्केट मोठ्या प्रमाणात घसरलेले आहे.

सध्याच्या परिस्थितीत भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावे?

सध्या भारतातील शेअर मार्केटमध्ये चांगलीच पडझड झाली आहे. अशा पडजडीचा फायदा गुंतवणूकदारांनी घेतला पाहिजे. यापूर्वीच गुंतवणूक केली आहे, त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर त्याच शेअर मध्ये आणखी गुंतवणूक केल्यास बाय पोझिशन खाली येईल आणि भविष्यात फायदा होईल.

नवीन गुंतवणूकदारांना शेअर मार्केट मधील सध्याची पडझड खूपच फायदेशीर ठरणार आहे. कारण सध्या शेअर मार्केटची जी स्थिती आहे, त्यापेक्षा किंचित खाली येण्याची शक्यता आहे.सध्याच्या स्थिती पेक्षा आणखी प्रचंड प्रमाणात शेअर मार्केट घसरेल असे वाटत नाही.
त्यामुळे सध्या चांगल्या कंपन्यांचे शेअर बाय करण्यास यापेक्षा सुवर्णसंधी नाही असे वाटते.

Leave a comment