*Microalbumin- मायक्रोअल्ब्युमिन
आपल्या शरीरातील मूत्राशयाचे काम कशाप्रकारे चालते हे पाहण्यासाठी मायक्रोअल्ब्युमिनची चाचणी घेतली जाते. त्यामुळे आपण निरोगी आहोत की नाही हे समजते. तुम्ही कधी मायक्रोअल्ब्युमिनची चाचणी घेतली आहे का? तर मग जाणून घ्या या चाचणीचे फायदे..
आपल्या लघवीतील मायक्रोअल्ब्युमिन चे प्रमाण अत्यल्प असणे गरजेचे 1 ग्रॅम लघवीमध्ये 30 मिलिग्रॅम पेक्षा कमी मायक्रोअल्ब्युमिन असणे गरजेचे आहे तरच आपले किडनीचे कार्य चांगल्या प्रकारे चालते असे समजावे. 30 मिलिग्रॅम पेक्षा जास्त मायक्रो एलबीन लघवीत असतील तर हळूहळू किडनीमध्ये बिघाड होत चाललेला आहे हे ओळखावे. तीनशे मिलिग्रॅम पेक्षा जास्त मायक्रोअल्ब्युमिन आढळल्यास किडनी खराब होण्याची अधिक शक्यता असते. म्हणूनच मायक्रोअल्ब्युमिन चाचणी घेणे आवश्यक आहे.
*मायक्रोअल्ब्युमिन चाचणी म्हणजे काय?
मायक्रोअल्ब्युमिन चाचणीला युरीन अल्बुमिन चाचणी असेही म्हणतात. या चाचणी द्वारे मूत्रातील अल्ब्युमिनचे प्रमाण मोजले जाते. थोडक्यात लघवीतील प्रोटीन्सचे प्रमाण किती आहे हे शोधले जाते. आणि मधुमेह , रक्तदाब इत्यादी आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी ही चाचणी खूप महत्त्वाची आहे.
*मायक्रोअल्ब्युमिन चाचणीचे महत्त्व
मधुमेह असणाऱ्या लोकांनी वर्षातून किमान एक ते दोन वेळा मायक्रोअल्ब्युमिन चाचणी घेणे आवश्यक आहे.
उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांनी सुद्धा वर्षातून एक ते दोन वेळा मायक्रोअल्ब्युमिनची चाचणी घेणे आवश्यक आहे.
लघवीतील ए सी आर पातळी खूप वाढल्यास मूत्रपिंडाचा गंभीर आजार होऊ शकतो आणि मूत्रपिंड खराब होऊ शकतं.
म्हणूनच मायक्रोअल्ब्युमिन चाचणीचे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्व आहे.