जून 2024 मध्ये केवळ दहा दिवसांसाठी अंतराळ स्थानकात गेलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर तब्बल नऊ महिने अंतराळातच अडकून पडले होते. ते आता 19 मार्च 2025 रोजी पहाटे पृथ्वीवर पोहोचतील. इतके दिवस अंतराळात राहिल्यामुळे सर्वांच्याच हृदयाचे ठोके वाढले होते. सुनीता विल्यम्सचे काय होणार? पण अखेर 19 मार्च रोजी तब्बल नऊ महिने सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघे अंतराळवीर पहाटेच्या वेळी फ्लोरीडाजवळ पृथ्वीवर पाय ठेवतील.
तब्बल नऊ महिने अंतराळात राहिल्यामुळे त्यांच्या परतीच्या प्रवासाची नासाला, अमेरिकेला आणि तमाम भारतीयांना सुद्धा हुरहुर लागली होती; पण सुनीता विल्यम्स यांनी याबाबत आपले मत खूप छान मांडले आहे. त्या म्हणतात की ही माझ्यासाठी मोठी संधी आहे.
अर्थात अंतराळात इतके दिवस राहिल्यामुळे मानवी शरीराचे खूप मोठे नुकसान होते. सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचेही हेच झाले आहे. या दोन अंतराळवीरांना अनेक शारीरिक संकटांना सामोरे जावे लागले आहे. तब्बल नऊ महिने अंतराळातच राहिल्यामुळे त्यांची हाडे ठिसूळ झाली आहेत. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे निर्वात पोकळीत राहून हाडे आकुंचन पावली आहेत. तरीसुद्धा अंतराळात राहून या दोन अंतराळवीरांनी वेगवेगळे अनेक प्रयोग केले आहेत.
*सुनिता विल्यम्स अंतराळातून कशी परतणार?
12 मार्च रोजी ड्रॅगन्स स्पेस क्राफ्ट द्वारे स्पेस वॉकचा क्रु टेन हे नासाच्या स्पेस स्टेशनच्या दिशेने झोपावेल. फ्लोरिडा येथून हे ड्रॅगन लाँच झालेले आहे. 13 मार्च रोजी हे ड्रॅगन इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला जोडले जाईल. परतीच्या प्रवासात निक हॉर्न हे या यानाचे पायलेट असतील. कॅप्सूल समुद्रात उत्तरेपर्यंत संपूर्ण जबाबदारी निक यांचीच असेल.
सुनिता विल्यम्स यांना अंतराळ कक्षातून परत आणण्याची जबाबदारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इलान मस्के यांच्यावर सोपवलेली होती. आणि इलॉन मस्क यांनी आपले कार्य चोखपणे बजावल्याचे दिसत आहे.
19 मार्च 2025 रोजी पहाटे चार ते सहा च्या दरम्यान सुनीता विल्यम्स तब्बल नऊ महिने 13 दिवसांनी फ्लोरिडा येथील जमिनीवर पाय ठेवेल तेव्हा भारतीयांनाच काय संपूर्ण विश्वातील लोकांना सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी अंतराळात दाखवलेल्या धाडसाबद्दल अभिमान वाटेल.
*पृथ्वीवर परतल्यावर सुनीता विल्यम्सला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागेल?
पृथ्वीवर परतल्यावर सुनीता विल्यम्स ला अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. तब्बल नऊ महिने तेरा दिवस अंतराळात झिरो ग्रॅव्हिटेशन स्पेस मध्ये राहिल्यामुळे त्यांना पृथ्वीवर नीट चालता येणार नाही. आहार घेण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतील. शारीरिक स्थिती खालावल्यामुळे मानसिक स्थिती सुद्धा बिघडण्याची शक्यता आहे. सुनीता विल्यम्स मनाने खंबीर आहेत. हे जरी खरे असले तरी त्यांना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे . त्यांचे दैनंदिन जीवन सुरळीत लागण्यासाठी किमान तीन ते सहा महिने इतका कालावधी लागेल. हाडे ठिसूळ झाल्यामुळे चालताना चुकून तोल जाऊन पडल्यास हाडांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे त्यांना त्यांच्या बिघडलेल्या पचनक्रियेला सुद्धा सामोरे जावे लागणार आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी मोठ्या आत्मविश्वासाने अंतराळात नऊ महिने विविध समस्यांना तोंड दिले आहे. आता पृथ्वीवर आल्यावर त्यांची दुसरी लढाई चालू होईल या लढाईत सुद्धा सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यशस्वी होतील.
अधिक माहितीसाठी क्लिक करा