नोबेल शांतता पुरस्कार विजेते
लुडविग क्विड
Ludwig Quidde
जन्म: 23 मार्च 1858
मृत्यू : 4 मार्च 1941
राष्ट्रीयत्व : जर्मन
पुरस्कार वर्ष: 1927
लुडविग क्विड हे स्वतः जर्मन देशाचे रहिवासी असूनही जर्मनीच्या सैन्य विस्तारास त्यांचा विरोध होता. युद्धानंतर सुद्धा जर्मनीद्वारे इतर देश ताब्यात घेणे आणि आपल्या देशात समावेश करणे, या गोष्टीला त्यांचा विरोध होता. ते आयुष्यभर जर्मनीच्या या हरकतींना आपल्या लेखांद्वारे विरोध करत राहिले. त्यांनी ‘लीग ऑफ नेशन्स’मध्ये जर्मनीला सदस्यत्व मिळण्यासाठीही प्रयत्न केले. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना 1927 चा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला.