उडीद या छोट्या वनस्पतीला शेंगा लागतात. या शेंगात ज्या बिया असतात त्या बियांचा खूप उपयोग आहे. या बियांपासून डाळ बनवली जाते. या डाळीचे उडीद डाळीचे (black gram/black pea) खूप उपयोग आहेत, तेच आपण जाणून घेऊया.
उडदाचे विविध पदार्थ
उडीद डाळ म्हटले की आपल्यासमोर दहिवडे ,इडली, डोसा, मेदुवडे असे चमचमीत पदार्थ डोळ्यासमोर येतात, पण याशिवायही उडदाचे अनेक पदार्थ बनवता येतात. उडीद डाळीची उत्तम प्रकारे आमटी म्हणजे सांबार बनवता येते. उडीद डाळीपासून उत्तम प्रकारे सूप पण बनवता येते.
उडीद डाळ चिल्ला पातळ क्रेप्स
असे क्रेप्स भिजवलेल्या उडीद डाळी पासून बनवले जातात. या डाळीत थोडे जिरे, धने आणि आपल्याला आवश्यक तेवढे तिखट घालून चवदार क्रेप्स बनवले जातात.
उडीद डाळ मेथी
हा एक असाच चवदार आणि रुचकर पदार्थ आहे. शिजवलेल्या उडीद डाळीत धने ,जिरे घालून उडीद डाळ मेथी हा पदार्थ बनवला जातो . हा पदार्थ गरमागरम भाकरी सोबत खायला खूप मजा येते.
उडीद डाळ बोंडा
हा पदार्थ गोल आप्पे सारखा आहे. हा पदार्थ बनवताना त्यात थोडा कांदा, ताज्या औषधी वनस्पती किंवा रानभाज्या चिरून उडीद डाळीचा बोंडा बनवल्यास तो अधिक पौष्टिक होतो.
उडीद हलवा
उडीद डाळीचा उत्तम हलवा बनवतात. हा हलवा चवदार रुचकर आणि पौष्टिक होण्यासाठी त्यात थोडे तूप घालतात. आपल्या चवीनुसार साखर ,दूध , वेलची इत्यादी पदार्थ घालून छान छान हलवा बनवतात. हा हलवा खूप पौष्टिक असतो.
उडीद डाळ टिक्की
हा पदार्थ सुद्धा खूप पौष्टिक आहे. उडीद डाळ टिक्की बनवताना थोडे बटाटे मिक्स केल्यास टिक्की अधिक चवदार आणि पौष्टिक बनते.
दाल मखानी
उडदाच्या डाळीपासून बनवलेली ही डाळ मखानी खूप लोकप्रिय आहे. ही दाल मखाने बनवताना त्यात लोणी, मलई, सुगंधी मसाले घालतात. त्यामुळे दाल मखानीचे डिश अतिशय सुंदर बनते. ही दाल मखानी रुचकर आणि पौष्टिक असते.
मेदुवडा
मेदुवडा हा महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये सुद्धा खूप प्रसिद्ध पदार्थ आहे.. हा पदार्थ बनवताना रात्री उडदाची डाळ भिजत घालायची. सकाळी त्यातील पाणी काढून तिचे मूळ पीठ करायचे. त्या पिठात आपल्याला आवश्यक असे नारळाची चटणी तिखट मिसळून त्याचे वडे बनवायचे आणि ते तळून घ्यायचे. तयार झालेले मेदुवडे दह्याबरोबर खाल्ल्यास खूप रुचकर लागतात.
दाल पराठा
उडदाच्या डाळीपासून बनवलेला गाल पराठा खूप रुचकर आणि पौष्टिक असतो. या डाळीच्या पिठात आले, हिरवी मिरची, आवश्यक तेवढा मसाला एकत्र मिसळून त्याचा लाटून पराठा बनवतात. त्या पराठ्यामध्ये कोथिंबीर सुद्धा टाकतात. त्यामुळे तो पराठा अधिक रुचकर होतो. असा तयार झालेला दाल पराठा भाकरीबरोबर खाण्यास खूप मजा येते.
उडदाचे फायदे
उडीद हा बहुगुणी आहे. त्याचे अनेक फायदे आहेत. आपल्या दैनंदिन आहारात उडदाच्या विविध पदार्थांचा समावेश असेल तर त्याचा फायदा आपल्याला निश्चितच होतो. आपल्या हृदयाचे आरोग्य चांगल्या प्रकारे सुधारते. मधुमेह, सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, पुरुषांच्या प्रजनन क्षमतेत वाढ, स्तनदा मातांसाठी अधिक पौष्टिक असे अनेक फायदे उडदाच्या पदार्थापासून आपल्याला मिळतात म्हणूनच आपल्या दैनंदिन आहारात उडदाचे विविध पदार्थ यांचा समावेश केला पाहिजे.
याशिवाय आपल्याला थकवा जाणवत असेल तर उडीद डाळीपासून बनवलेला एखादा पदार्थ खाल्ल्यास थकवा कमी येतो. मृदाच्या डाळीमध्ये प्रचंड प्रमाणात प्रथिने असल्यामुळे उडदाची डाळ बहुगुणी मांडली जाते. आपली पचनक्रिया बिघडली असेल तर उडदाच्या डाळीचे पदार्थ नियमित खाल्याने आपल्या मोठ्या प्रमाणात फायबर मिळते . या फायबरमुळे आपली पचनक्रिया सुधारते. रक्तातील साखर कमी करण्यास उडीदाचे पदार्थ उपयुक्त ठरतात. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी उडीद डाळीचे पदार्थ नियमित खावेत.