Terminalia bellirica म्हणजेच बेहडा होय या झाडाचे खूप उपयोग आहेत. बेहडा हे झाड पश्चिम घाटात मुबलक प्रमाणात आढळते. अर्थात या झाडाची लागवड कोण करते? वृक्षतोड होऊनही बेहडा झाडाचे अस्तित्व आजही कसे टिकून आहे ,याबाबत आणि बेहडा झाडाचे फायदे काय आहेत याबाबत आपण अधिक माहिती घेऊया.
बेहडा हे झाड पश्चिम घाटात मुबलक प्रमाणात आढळते. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा उत्तर पश्चिम घाटात मुबलक प्रमाणात बेहडा झाडाची उपलब्धता आढळून येते.
बेहडा आणि हॉर्नबिल पक्षी
बेहडाचे झाड आणि हॉर्नबिल पक्षी यांचे खूप मोठे असे कनेक्शन आहे. हॉर्नबिल पक्षी हा बेहडाच्या झाडाला लागणारी फळे खाऊन आपली उपजीविका करतो. त्याच झाडाच्या ढोलीत त्याचे घरटे असते. हे हॉर्नबिल पक्षी बेहडाची फळे खाऊन जंगलात इतरत्र आपल्या विष्टेवाटे टाकत असतात. त्यामुळे बेहडांच्या झाडाची पुनर्निर्मिती होण्यास एक प्रकारे हे हॉर्नबिल पक्षी मदत करत असतात. बेहडाची झाडे तोडली तर हॉर्नबिल पक्षांचे अस्तित्व धोक्यात येईल.
Nature connect company चे कार्य
नेचर कनेक्ट कंपनी ही बेहडाच्या झाडावर संशोधन करत असून त्या झाडांचं संगोपन होण्यासाठी विशेष काळजी घेते. त्याचबरोबर ही कंपनी या झाडाची साल काढून ती परदेशाला विक्रीसाठी पाठवते आणि त्याद्वारे मिळालेल्या पैशातून देवराई संगोपन होण्यासाठी गावोगावच्या देवस्थान कमिटीकडे हे पैसे वर्ग करते. हे नेचर कनेक्ट कंपनी एक प्रकारे हॉर्नबिल पक्षांचे, बेहडाच्या झाडांचे आणि निसर्गाचे संवर्धन करण्याचे खूप मोठे काम करते.
Benefits of terminalia Bellirica बेहडाच्या झाडाचे उपयोग
महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात आढळणाऱ्या बेहडा या झाडाचे खूप उपयोग आहेत. पोट आणि पोटाच्या संबंधित विविध आजारावर बेहडा या वनस्पतीचा उपयोग होतो. पोटदुखी, पोटाचे विकार, अपचन यासाठी बेहडा खूप उपयोगी आहे. म्हणूनच बेहडासारख्या निसर्गातील अनेक वनस्पतींचे संरक्षण करा. संवर्धन करा.