काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी 22 एप्रिल 2025 रोजी आतंकवाद यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला आणि 26 पर्यटकांना प्राण गमवावे लागले. त्या दिवसापासून काश्मीरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावत चालली आहे. हे असेच चालले तर पुढे काय? जाणून घेऊया सविस्तर माहिती.
काश्मीर म्हणजे भारताचा स्वर्ग: Kashmir is India’s paradise.
कडक उन्हाळ्यातही संपूर्ण भारत उष्णतेच्या लाटेत असताना काश्मीरमध्ये मात्र उबदार थंडी असते. काश्मिरातील अल्हाददायक वातावरण आणि नयनरम्य निसर्ग हा पर्यटकांना उन्हाळ्यात खुणावतो. काश्मीर मधील अनेक सुंदर बागा फुललेल्या असतात. म्हणूनच काश्मीरला भारताचा स्वर्ग असे म्हटलेले आहे. काश्मीरमध्ये संपूर्ण भारतातूनच काय, जगातूनही अनेक पर्यटक येतात आणि काश्मीरच्या निसर्गसौंदर्याचा मनमुरादपणे आनंद लुटतात.
पर्यटकांची वाढती संख्या आणि पाकिस्तानचा जळफळाट: The growing number of tourists and Pakistan’s jealousy
गेल्या दोन वर्षात काश्मीरला भेट देणारे कोट्यवधी पर्यटक निघाले. सुमारे दोन कोटीहून अधिक लोकांनी गेल्या दोन वर्षात काश्मीरला भेट देऊन काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटला. गेल्या दोन वर्षात वाढलेली पर्यटकांची संख्या आणि तेथील स्थानिक लोकांनी मग ते हिंदू असो की मुस्लिम- यांनी पर्यटकांच्या सोयीसाठी मनापासून मेहनत घेतली. त्यांची चांगली सोय केली. चांगल्या सुविधा पुरवल्या . त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नाते निर्माण केले आणि म्हणूनच काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आणि नेमकी हीच गोष्ट पाकिस्तानला खटकत गेली. काश्मीर मधील मुस्लिम लोकांनी पर्यटकांना दिलेल्या सेवेला पर्यटकांनी चांगलीच दाद दिली. काश्मीरमध्ये गेल्यानंतर पर्यटकांना सेवा करण्यासाठी येणारा माणूस तो हिंदू आहे की मुस्लिम याची कधीच काळजी वाटली नाही. काश्मीरच्या लोकांचा मुख्य व्यवसाय पर्यटकांची सेवा करणे हाच होऊन बसला. काश्मीरकरांनाही जाणीव झाली, की आपला उदारनिर्वाह पर्यटकांच्या जीवावर आहे आणि पर्यटकांनाही मिळणारी चांगली वागणूक स्थानिक सेवा करणाऱ्या लोकांच्यासाठी फायदेशीर ठरली. काश्मीरच्या वाढत्या पर्यटनामुळे काश्मीर बाबत लोकांच्या मनात चांगल्या भावना निर्माण झाल्या. काश्मिरी लोकांच्या बाबत इतर सर्व भारतीयांच्या मनात आदर आणि प्रेमाच्या भावना निर्माण झाल्या आणि हीच गोष्ट पाकिस्तानच्या डोळ्यात खूपत गेली आणि त्यातूनच अतिरेकी कारवाई झाली. खरे तर पाकिस्तानला युद्ध नको आहे, पण काश्मीर अशांत हवा आहे म्हणूनच पाकिस्तान नेहमीच काही ना काही कुरापत काढत असतो. अर्थात त्याचे परिणामही पाकिस्तानला सुद्धा भोगावे लागतात.
22 एप्रिल 2025 नंतर पर्यटक थंडावले :Tourists decreased after April 22, 2025
22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या आतंकवाद्यांच्या हल्ल्यात 26 पर्यटकांना प्राण गमवावे लागल्याने त्यानंतर काश्मीरला जाणाऱ्या अनेक पर्यटकांनी आपले बुकिंग रद्द केले. सुमारे 60% ते 80 टक्के लोकांनी आपले बुकिंग रद्द केल्यामुळे काश्मीर ओसाड वाटू लागला. काश्मीरचे सौंदर्य पर्यटकांना खुलवत असतानाही अतिरेक्यांच्या भीतीमुळे अनेक पर्यटकांनी आपले बुकिंग रद्द केले. या घटनेमुळे काश्मिरी लोकही हवालदिल झाले आहेत. म्हणूनच त्याने हिंदू मुस्लिम भाई भाई अशी घोषणा देत काश्मीरमध्ये मोर्चाही काढला आणि अतिरेक्यांचा निषेधही केला.
काश्मीरला गेलेच पाहिजे :We should go to Kashmir
काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे काश्मीरला जाणे टाळणे हे चुकीचे आहे. भारत सरकारने काश्मीरमध्ये शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पर्यटकांना विश्वास दिला पाहिजे की आम्ही तुमची पूर्ण काळजी घेत आहोत. खरे तर भारत सरकारने पाकवर सिंधू जलसाठ्याबरोबरच भारत-पाक व्यापार बंद करून पाकिस्तानला चपराक दिली आहे . हे जरी खरे असले तरी संपूर्ण भारतातील पर्यटकांनाही आत्मविश्वास येईल अशा पद्धतीचे आश्वासन देणे हे सुद्धा सरकारचेच काम आहे. पण अद्याप तरी सरकारने अशा प्रकारचे कोणतेही आश्वासन दिले नाही. पण काही पत्रकार बंधू काश्मीरला जात आहेत आणि भारतीयांना आवाहन करत आहेत, की आपणही काश्मीरला या आणि काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटा.
काश्मीरला पुन्हा पर्यटकांची गर्दी वाढेल :Tourists will flock to Kashmir again
सध्याच्या परिस्थितीत जरी पर्यटकांनी बुकिंग कॅन्सल करून काश्मीरला जाण्याचे टाळले असले तरी लवकरच भारतीय लोक काश्मीरला भेट देण्यासाठी जातील . काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटतील आणि काश्मीरचे दैनंदिन जीवन पुन्हा एकदा सुरळीत चालेल. भारतीय ऐक्याचे प्रतीक काश्मीर आहे. काश्मीरला आपण फुलासारखे जपले पाहिजे . काश्मीरला पुरेसे संरक्षण दिले पाहिजे. पर्यटकांना विश्वास दिला पाहिजे. निश्चितच पुन्हा एकदा काश्मीर पर्यटकांच्या गर्दीत बुडून जाईल आणि भारताचे वैभव पुन्हा एकदा फुललेले दिसेल.