नोबेल शांतता पुरस्कार विजेते
फ्रँक बिलिंग किलो
Frank Billings Kellogg
जन्म: 22 डिसेंबर 1856
मृत्यू: 21 डिसेंबर 1937
राष्ट्रीयत्व : अमेरिकन
पुरस्कार वर्ष:1929
फ्रैंक बिलिंग्ज किलॉग हे 1925 ते 1929 पर्यंत अमेरिकेचे विदेश सचिव होते. फ्रान्सचे पंतप्रधान अरिस्टाइड ब्रिआन आणि किलॉग यांच्यात 1928 साली एक महत्त्वपूर्ण करार झाला. या करारानुसार युद्धाला राष्ट्रीय नीती मानण्यास विरोध केला. या करारात फ्रैंक बिलिंग्ज किलॉग यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला.