प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी सोशल मीडियावर सुरू असलेल्या आभासी जगाचा वास्तवदर्शी प्रवास कवितेच्या माध्यमातून मांडला आहे. त्यांच्या या कवितेला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणात सर्वांनी कविता शेअर केली आहे.
आज सोशल मीडिया वर काय आणि कसं चालू आहे ह्याच कळकुट्ट वास्तव सलील कुलकर्णी यांनी आपल्या कवितेत मांडलय
नवीन डेटा पॅक दे रे
आभाळावर थुंकीन म्हणतो
रोज वेगळं नाव लावून
लपून लपून भुंकीन म्हणतो
आभाळावर थुंकीन म्हणतो .. pic.twitter.com/WTHhDUdPep— Shekhar (@Shekharcoool5) April 16, 2025