पहलगाम हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले आणि पाकिस्तानला यातून धडा घेण्याचे ठणकावून सांगितले, पण पाकिस्तानच्या छुप्या कारवाया चालूच राहिल्याने भारताने पाकिस्तानचे महत्त्वाच्या लष्करी स्थळांवरील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली. शुक्रवारी रात्री पाकने केलेल्या ड्रोन हल्ल्याला प्रतिकार करून सगळेच हल्ले भारताने निष्प्रभ ठरवले . ते कसे? सविस्तर जाणून घेऊया.
पाकने केले 26 ड्रोन हल्ले- Pakistan carried out 26 drone attacks.
7 मे 2025 रोजी पाकिस्तानने भारताच्या पंधरा शहरातील लष्करी ठाण्यांवर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भारताने ते सर्व हल्ले परतवून लावले. पण पाकिस्तानची कुरघोडी मोडीत काढण्यासाठी भारताने कराची, लाहोर, रावळपिंडी, इस्लामाबाद इत्यादी अनेक ठिकाणांमध्ये अस्तित्वात असलेली पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करून टाकली. शुक्रवारी रात्री म्हणजे 9 मे आणि 10 मे रोजी पाकिस्तानने पुन्हा 26 ड्रोन द्वारे हल्ले केले. अंधार पडताच पाकिस्तानने बारामुल्ला ते भूजपर्यंत ड्रोनच्या द्वारे अटॅक केला. पण भारतीय लष्कर डोळ्यात तेल घालून पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांकडे लक्ष ठेवणे होते. भारताने सर्व हल्ले परतवून लावल्याने पाकिस्तानचा ड्रोन हल्ला पूर्णपणे निष्प्रभ ठरला.
सीमावर्ती भागात पाकिस्तानने केला तोफांचा मारा :-भारताचे दिले चोख प्रत्युत्तर: Pakistan fired artillery shells along the border: India gave a befitting reply
ड्रोन हल्ले करत अनेक ठिकाणी सीमावर्ती भागात पाकिस्तानने शुक्रवारी रात्री आणि पहाटे तोफांचा मारा केला; पण भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले.
राजौरीमध्ये पाकिस्तानचे दहा ड्रोन पाडले: 10 Pakistani drones shot down in Rajouri.
राजौरी परिसरात पाकिस्तानने ड्रोन हल्ला केला होता. या परिसरात भारतीय लष्कराने दहा ड्रोन पाडल्याचे वृत्त हाती आले आहे.
जम्मू काश्मीर परिसरात ब्लॅकआऊट -Blackout in Jammu and Kashmir
शुक्रवार दिनांक 9 मे 2025 रोजी अंधार पडताच पाकिस्तानने ड्रोन हल्ले आणि तोफांचा गोळीबार सुरू केल्याने जम्मू-काश्मीर परिसरात अनेक ठिकाणी भारतातर्फे ब्लॅकआऊट करण्यात आला. श्रीनगरमध्ये संपूर्ण ब्लॅकआऊट करण्यात आले. तर उरी ,जम्मू, पूंछ ,सांबा ,राजौरी , श्रीनगर, जैसलमेर,अमृतसर , कच्छ, पठाणकोट, पटणा, गुरुदासपूर, वडगाव ,होशियापूर, अवंतीपुरा, फिरोजपूर ,फलोदी ,नागापूर, चालंधर ,तरणतारण इत्यादी अनेक ठिकाणी भारताने ब्लॅकआऊट केले. पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याच्या आणि गोळीबाराच्या दिशा चुकवण्यासाठी, पाकिस्तानचा अचूक मारा होऊ नये आणि मोठे नुकसान होऊ नये म्हणून भारताने जम्मू काश्मीर परिसरात अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले होते.
ब्लॅकआउट म्हणजे काय ?
ब्लॅकआऊट हा शब्द अनेक अर्थाने वापरला जातो. युद्धामध्ये ब्लॅकआऊट करणे म्हणजे रात्रीच्या वेळी काही कालावधीसाठी किंवा संपूर्ण रात्रभर विद्युत पुरवठा बंद करणे होय. याशिवाय दूरदर्शन सेवा, रेडिओ सेवा सुद्धा बंद करणे, इंटरनेट बंद करणे इत्यादी सुविधा काही कालावधीसाठी बंद करणे म्हणजे ब्लॅकआऊट करणे होय.
नाटकात, सिनेमात एखाद्या प्रसंगानंतर अंधार पाडला जातो आणि त्याला जोडून दुसरा प्रसंग दाखवला जातो. याला सुद्धा ब्लॅकआऊट म्हणतात. पण युद्धामध्ये ब्लॅकआऊट करणे म्हणजे त्या परिसरातील विद्युत पुरवठा पूर्णपणे थांबवणे होय.
पाक नागरी वस्त्या आणि प्रवासी विमानांना ढाल बनवतोय -Pakistan is shielding civilian settlements and passenger planes
भारतीय सैन्याने केलेल्या धडक मोहिमेमध्ये पाकिस्तानला काही सुचेनासे झाले आहे. जगासमोर आपली अब्रू वाचवण्यासाठी पाकिस्तान काहीतरी करण्यासाठी धडपडत आहे. पण बुडत्याचा पाय खोलातच जात आहे. पाकिस्तानने गुरुवारी रात्री भारतातील सीमेजवळील अनेक नागरी वस्त्यांमध्ये आणि धार्मिक स्थळांवर , तसेच लष्करी स्थळांवर 36 ठिकाणी 300 ते 400 ड्रोन हल्ले केले; पण भारताने हे सर्व हल्ले परतवून लावले. भारताने सर्व ड्रोन पाडले. त्यामुळे पाकिस्तानची नाचक्की झाली. पण पाकिस्तानचे उपद्व्याप चालूच आहेत. नागरी वस्त्यांबरोबरच प्रवासी विमानांवरही पाकिस्तानचा डोळा आहे. पाकिस्तान भारतावर ड्रोन द्वारे हल्ले करण्यासाठी तुर्कीचे सोंगर ड्रोन वापरत आहे. असे कर्नल सोफिया यांनी लष्कराच्या वतीने सांगितले.
अमेरिकेची उलट सुलट प्रतिक्रिया- America’s backlash
भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑपरेशन सिंदूर नंतर युद्धाला तोंड फुटते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली असताना अमेरिकेने आपण मध्यस्थी करू शकतो, असे विधान केले होते; पण आता अमेरिकेने हात झटकले आहेत. भारत आणि पाक यांच्यात युद्ध झाले तर आमचा काहीही संबंध नाही, असे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष यांनी जाहीर करून आपली उलट सुलट भूमिका असल्याचे सिद्ध करून दाखवले. भारत-पाक युद्धात अण्वस्त्रांचा वापर होऊ नये यासाठी अमेरिका मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही अमेरिकेने स्पष्ट केले. भारत आणि पाक यांना मध्यस्थीची गरज असल्यास आम्ही करू, अशीही अमेरिकेने प्रतिक्रिया दिलेली आहे.
भारताचा संयम: पाकही शांत- India’s restraint: Pakistan is also calm
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत युद्ध होऊ नये, अशी भारताची उघड भूमिका आहे. पण याचा अर्थ पाकिस्तानने केलेल्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर न देणे असा घेऊ नये. असेही भारताने ठणकावून सांगितले आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर भारताने ते सर्व हल्ले परतवून लावले; पण भारताने पाकिस्तानच्या कोणत्याही स्थळांवर हल्ला केला नाही. सध्या भारताने संयम ठेवला आहे. पाकिस्तानही काही वेळासाठी शांत झाला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होऊ नये, अशी अनेक पाकिस्तानी नेत्यांची आणि पाकिस्तानी जनतेचीही मागणी पुढे येत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या सरकारवर आणि पाकिस्तानच्या लष्करावर प्रचंड दबाव येत आहे. म्हणूनच पाकिस्तानी लष्कर आक्रमक भूमिका घेत नसल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानने हे युद्ध थांबवण्याचे जाहीर केल्यास त्यात त्यांचेच हित आहे.
सायबर हल्ल्यांचा जोर वाढला- Cyber attacks have increased in intensity
भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावपूर्ण वातावरण झाल्यापासून भारतावर अनेक सायबर हल्ले झालेले आहेत आणि होत आहेत. केवळ महाराष्ट्र सायबर विभागाने आत्तापर्यंत दहा लाख सायबर हल्ले रोखले आहेत. यावरून सायबर हल्ल्याची तीव्रता किती भयानक आहे , हे लक्षात येईल. शुक्रवार दिनांक 9 मे रोजी दिवसभरात पाच हजार तीनशे फेक न्यूज हटवल्या.
भारतीय मीडियाचा उतावीळपणा -Indian media’s haste
पहलगाम हत्त्याकांडनंतर ऑपरेशन सिंदूर भारताने हाती घेतले आणि ते यशस्वी केले. त्यानंतर भारत आणि पाक यांच्यात प्रचंड तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. अशावेळी मीडियाने अनेक फेक न्यूज देऊन विनाकारण भारत आणि पाक यांच्यात आणखी तणाव निर्माण करण्याचे काम केले आहे. जागतिक पातळीवर ही फेक न्यूजमुळे प्रतिमा मलिन होत आहे. उतावीळ मीडियाने चुकीच्या बातम्या देऊ नयेत. भारतीय लष्कराला बळ द्यावे.