महाराष्ट्रात आणि देशातही अनेक ठिकाणी काजवा महोत्सव साजरा केला जातो; पण याचा थेट परिणाम त्यांच्या प्रजनन क्षमतेवर होतो. त्यामुळे येथून पुढे काजवा महोत्सवाला आळा बसणार की हौशी पर्यटकांच्यासाठी काजव्यांचा बळी जाणार? याविषयी जाणून घेऊया अधिक माहिती.
महाराष्ट्रात कोठे कोठे काजवा महोत्सव साजरा केला जातो?
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मे महिन्याच्या अंतिम टप्प्यात आणि जून महिन्याच्या पंधरवड्यात काजव्यांचा झगमगाट पाहायला मिळतो. यातूनच काजवा महोत्सवाचा जन्म झाला आणि त्याला रात्रीच्या पर्यटनाला चालना मिळाली; पण ज्या पर्यटनाच्या गोंगाटामुळे, वाहनांच्या हॉर्नच्या कर्कश आवाजामुळे काजव्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याचा दावा पर्यावरण प्रेमींनी केला होता.अशा प्रकारचा काजवा महोत्सव महाराष्ट्रात दाजीपूर अभयारण्य-राधानगरी,महाबळेश्वर, कळसुबाई- हरिश्चंद्रगड,राजमाची, पुरुषवाडी, प्रभावळवाडी, भीमाशंकर, माळशेज घाट अशा अभयारण्यात मे महिन्याच्या अखेरीस काजवा महोत्सव भरवला जातो आणि म्हणूनच या काचवा महोत्सवावर बंदी घालण्यासाठी गणेश बोऱ्हाडे, संगमनेर या पर्यावरण प्रेमीने न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यामुळे काजवा महोत्सव चांगलाच चर्चेत आला आहे.
याचिका कर्त्याचे काय म्हणणे आहे?
काजवा महोत्सवावर बंदी आणण्यासाठी गणेश बोऱ्हाडे, संगमनेर या पर्यावरण प्रेमीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याच्या म्हणण्यानुसार जैवविविधतेचा हॉटस्पॉट असलेले राज्यातील संरक्षित अभयारण्यासारखा परिसर संरक्षित झोन आहेत. काजवे पाहण्याच्या निमित्ताने जैवविविधतेला हानिकारक पर्यटकांच्या वर्तणुकीला त्यामुळे आळा बसेल. त्यामुळे काजव्यांचे प्रजनन व्यवस्थितपणे पार पडेल. हाच या याचिके मागील हेतू असल्याचा त्यांनी स्पष्ट केले.
हरित न्यायालयाच्या खंडपीठाचा निर्णय
काजवा महोत्सवावर आळा घालण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायालयाच्या खंडपीठाने वनविभागास असे निर्देश दिले आहेत की काजवा महोत्सवांवर बंदी घालावी.जेणेकरून काजव्यांचे प्रजनन थांबणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.खंडपीठाच्या या निर्णयामुळे इथून पुढे काजवा महोत्सव साजरे करण्यास अनेक अडचणी येणार असल्या तरी काजव्यांचे प्रजनन मात्र व्यवस्थित पार पाडणार आहे.त्यामुळे जैवविविधतेला चालना मिळणार आहे. अशा प्रकारचे अभयारण्यात महोत्सव साजरे करणे हे पर्यावरणाच्या आणि जैवविविधतेच्या दृष्टीने चुकीचे आहे. म्हणूनच हरित न्यायालयाच्या खंडपीठाने जो निर्णय दिलेला आहे तो स्वागतार्ह आहे.