Buddha Life Story-Part 21 :सिद्धार्थ गौतमाचा गृहत्याग
शाक्य संघात झालेल्या पराभवामुळे आणि कोरियांविरुद्ध शाक्यांनी पुकारलेल्या युद्धात सहभागी होण्यास नकार दिल्यामुळे शाक्य संघाने दिलेली शिक्षा म्हणून सिद्धार्थने परिव्रजेचा (संन्यास) निर्णय घेतला होता. पत्नी यशोदरेने या परिव्रज्येसाठी दिलेल्या संमतीमुळे सिद्धार्थचे मन थोडे हलके झाले होते.आपल्या पुत्राचे, पत्नीचे अखेरचे दर्शन घेऊन त्यांच्याकडे वात्सल्यवृत्तीने पाहून सिद्धार्थ यशोदरेच्या महालातून बाहेर पडला. कपिलवस्तु नगरातच भारद्वाज ऋषीचा आश्रम होता. … Read more