Gold prices-सोन्याचा दर एक लाखांवर…?

जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्याला चांगलाच भाव आला आहे. सोन्याच्या दराने 20 जुलै 2025 रोजी एक लाखांचा टप्पा पार केला आहे. स्त्रियांच्या बाबतीत सोने हा जिव्हाळ्याचा विषय असून सोन्याचा भाव कितीही वाढला तरी सोन्याची खरेदी काही थांबलेली नाही. सोन्याचा दर सतत का वाढत आहे? Why is the price of gold increasing? सध्या जागतिक … Read more

Maharashtra Politics-उद्धव ठाकरे यांना फडणवीस यांची खुली ऑफर :सत्येत या

विरोधी पक्ष नेते आंबादास दानवे यांची विधान परिषदेतील कारकीर्द संपल्याने त्यांच्या निरोपासाठी जमलेल्या समारंभात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्यासाठी खुली ऑफर दिली. काय घडली घटना? सविस्तर जाणून घेऊया. बुधवार दिनांक 16 जुलै 2025 रोजी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची विधानपरिषदेतील कारकीर्द संपल्यामुळे त्यांना निरोप देण्यासाठी खास कार्यक्रम आयोजित … Read more

Kajwa Mahotsav-काजवा महोत्सव एक झगमगाट? काय होतो काजव्यांच्या प्रजननावर परिणाम?

महाराष्ट्रात आणि देशातही अनेक ठिकाणी काजवा महोत्सव साजरा केला जातो; पण याचा थेट परिणाम त्यांच्या प्रजनन क्षमतेवर होतो. त्यामुळे येथून पुढे काजवा महोत्सवाला आळा बसणार की हौशी पर्यटकांच्यासाठी काजव्यांचा बळी जाणार? याविषयी जाणून घेऊया अधिक माहिती. महाराष्ट्रात कोठे कोठे काजवा महोत्सव साजरा केला जातो? महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मे महिन्याच्या अंतिम टप्प्यात आणि जून महिन्याच्या पंधरवड्यात … Read more

Fragmentation Act-तुकडे बंदी कायदा कुणाला फायदा कुणाचा तोटा? याबाबत जाणून घेऊया सविस्तर माहिती.

महाराष्ट्र शासनाने नुकताच तुकडे बंदी कायदा काही कालावधीसाठी शिथिल केला आहे. या कायद्याचा फायदा नेमका कुणाला होणार आहे? हा कायदा केल्यामुळे त्याचा फटका कुणाला बसणार आहे? तुकडे बंदी कायदा म्हणजे काय? What is Fragmentation Act भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून हा तुकडेबंदी कायदा अस्तित्वात आला आहे. या कायद्याअंतर्गत दहा गुंठ्यांपेक्षा कमी जमीन खरेदी करता येत नव्हती. … Read more

Milk Subsidy-आता दूध उत्पादकही शेतकरी समजले जातील, शेतकऱ्यांच्या सर्व सवलतींचा लाभ मिळणार..

दूध उत्पादकांना कृषीचा दर्जा देण्याचे शासनाने जाहीर केल्याने दूध उत्पादकांना आता शेतकरी समजले जाणार आहे. त्यामुळे त्यांना कर्ज, विमा इत्यादी योजनांचा लाभ होणार आहे. सोलर पंप, विद्युत पंप यासाठीही त्यांना आता सवलत मिळणार आहे. दुग्ध व्यावसायिकांना कृषीचा दर्जा महाराष्ट्रात ज्यांना शेती नाही असे अनेक लोक पर्यायी व्यवसाय करत असतात आणि त्यावर आपला गुजारा करत असतात. … Read more

Prada Kolhapuri Chappal -कोल्हापुरी चपलासाठी पन्नास हजार कोटीची प्राडा कंपनी कोल्हापुरात पाहूया काय आहे बातमी सविस्तर

जगात भारी कोल्हापुरी असे म्हटले जाते ते कोल्हापुरी चपलाने सिद्ध करून दाखवले. कोल्हापुरी चपलाची पाहणी करण्यासाठी जगप्रसिद्ध पन्नास हजार कोटीची प्राडा कंपनी नुकतीच कोल्हापुरात आलेली आहे. कोल्हापुरी ब्रँड काय आहे हे समजून घेण्यासाठी ही कंपनी आलेली आहे. जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी चपलाची ख्याती जगप्रसिद्ध आहे. या चपलांचे वैशिष्ट्य म्हणजे जनावरांच्या कातड्यापासून हाताने बनवलेले हे चप्पल … Read more

Bihar Crime-बिहारात हत्यांमध्ये वाढ, कायदा व सुव्यवस्था विस्कळीत

बिहार हे नेहमीच अशांत राज्य असले तरी अलीकडे बिहारमध्ये हत्यांचे प्रमाण वाढलेले आहे.त्यामुळे नितीशकुमार सरकारच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चांगलाच गंभीर झालेला आहे. राज्य गुन्हे रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारी  बिहार राज्य गुन्हे ब्युरोने जी नवीन आकडेवारी दिलेली आहे त्या आकडेवारीनुसार बिहार राज्यात जानेवारी 2025 ते जून 2025 च्या दरम्यान दर महिन्याला सरासरी 229 हत्या बरोबरच 1376 … Read more

Panhala To Pawankhind campaign-पावनखिंड मोहीम की इव्हेंट?

दरवर्षी महाराष्ट्रात दरवर्षी 12 जुलै रोजी पन्हाळगड ते विशाळगड मोहीम असते . या मोहिमेलाच पावनखिंड मोहीम असे म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 जुलै 1660 रोजी पन्हाळगडावरून विशाळगडला निसटून जाण्यासाठी पलायन केले होते. वाटेत रणसंग्राम घडला आणि अनेक बाणदल सैन्य धारातीर्थी पडले. त्याची आठवण म्हणून दरवर्षी अनेक इतिहासप्रेमी लोक पन्हाळगड ते विशाळगड मोहीम काढतात; पण … Read more

India Lord’s Test Defeat-लॉर्ड्सवर भारताचा पराभवच !

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स या मैदानावर अखेर भारत जिंकता जिंकता हरला. भारतीय खेळाडूंनी अगदी शर्थीची झुंज दिली;पण अखेर या लॉर्ड्सच्या परंपरेनुसार भारत पुन्हा एकदा लॉर्ड्सवर हरला. मालिकेत इंग्लंडचा 2-1 ने विजय भारतीय कर्णधार शुभमन गिल याने कर्णधाराची सूत्रे याच इंग्लंड दौऱ्यात स्वीकारली आहेत. कर्णधार म्हणून शुभमन गिल प्रथमच लॉर्ड्स मैदानावर खेळला; पण भारतीय … Read more

Shubanshu Shukla return to Earth-18 दिवस शून्य अंतराळात असणारा शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतणार

भारतीय हवाई दलाचा पायलट शुभांशू शुक्ला गेले 18 दिवस शून्य गुरुत्वात अंतराळात राहत होता. इस्रो आणि नासा यांच्या संयुक्त विद्यमाने अंतराळ प्रवास आयोजित केला होता. भारतातर्फे इस्रोने शुभांश शुक्ला याची निवड केली होती. 25 जून 2025 रोजी अंतराळयान पृथ्वीवरून अंतरिक्षाकडे झेपावले .15 जुलै 2025 रोजी हे अंतराळयान आणि शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतणार आहेत. ऑक्झिओम-4 मोहीम  … Read more