Ancient Cave Mahableshwer-महाबळेश्वरमधील एलिफंट हेडच्या अगदी पायथ्याशी असलेली एक छोटीशी गुहा तुम्ही पहिली आहे का ?

महाबळेश्वरमधील एलिफंट हेडच्या अगदी पायथ्याशी वयगाव गावापासून दोन किलोमीटर अंतरावर एक छोटीशी गुहा आहे. या गुहेशेजारील एक छोटासा धबधबा आहे.या गुहेच्या परिसरातील वातावरण अल्हाददायक आहे. पावसाळ्यात हा परिसर पाहण्याचा आनंद लुटण्यास हरकत नाही.

या गुहेबाबत महाबळेश्वर परिसरात अनेक आख्यायिका आहेत. ही गुहा पांडवकालीन असल्याचे म्हटले जाते. दुसरी गोष्ट म्हणजे महाबळेश्वरच्या पायथ्याशी म्हणजे एलिफंट हेडच्या पायथ्याशी वयगाव हे दोन हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात कातकरी हे आदिवासी लोक राहतात.फार वर्षांपूर्वी म्हणजे अश्मयुगात कातकरी लोक या गुहेत राहत असत आणि ही गुहा त्यांनीच खोदून काढलेली आहे असेही म्हटले जाते.

सम्राट अशोक काळात म्हणजे मौर्यकाळात औषधी वनस्पती पासून औषधे बनवण्यासाठी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती मिळतात अशा ठिकाणी औषधी वनस्पतींपासून आयुर्वेदिक औषधे करण्याचे काम केले जात असे. या गुहेत गेल्यानंतर इथे बारकाईने निरीक्षण केले असता अनेक ठिकाणी औषधे चेचण्यासाठी आवश्यक असलेली व्हाण(खोलगट जागा)येथे पाहायला मिळतात. त्यामुळे ही गुहा मौर्यकालीन असावी असे वाटते.

Krishna River – कृष्णेच्या उगमाच ठिकाण तुम्हाला माहितीये का?पाहा विडिओ

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील महाबळेश्वरच्या जोर परिसरातील कृष्णा नदीच्या अगदी उगमाजवळील खळाळत्या पाण्याचे हे दृश्य आहे. महाबळेश्वरच्या घाटमाथ्यावर कृष्णा नदीचा उगम झाला असे म्हटले जाते;पण प्रत्यक्षात कृष्णेचा उगम हा जोर या गावापासून काही अंतरावरच आहे. हा उगम प्रवाह महाबळेश्वरच्या घाट माथ्यावरून येणाऱ्या अनेक प्रवाहांपेक्षा खूप मोठा प्रवाह आहे. म्हणूनच कृष्णेचे उगमस्थान हे जोर गावापासून … Read more

Public Safety Act-जन सुरक्षा कायदा- लोकशाहीसाठी धोक्याची घंटा? 

सन 2024 पासून सध्याचे विद्यमान सरकार जन सुरक्षा कायदा पाहत आहे. चालू वर्षाच्या पावसाळी (जुलै 2025) अधिवेशनात हा कायदा सरकार पास करून घेण्याचा विचार करत आहे. हा कायदा म्हणजेच लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असेल. जनतेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळणारच नाही. तुम्हाला सरकार विरुद्ध आवाज उठवता येणार नाही. आंदोलन करता येणार नाही. जनसुरक्षा कायद्याचा कडक अंमल झाला तर … Read more

Difference between baking powder and baking soda-बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर यातील नेमका फरक काय?

बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर यांमध्ये सूक्ष्म फरक आहे. वरवर पाहता हे दोन्ही पदार्थ एकच आहेत असे वाटते; पण प्रत्यक्षात त्यांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत आणि त्यांचा उपयोगही वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो. त्या दोन्हीही पदार्थांची ओळख आपण करून घेऊ. बेकिंग सोडा [धुण्याचा सोडा] :Baking soda बेकिंग सोड्यालाच धुण्याचा सोडा असे म्हणतात. बेकिंग सोडा प्रामुख्याने कपडे धुण्याच्या … Read more

Emergency-इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी का आणली होती? 

25 जून 1975 रोजी इंदिरा गांधींनी भारतात आणीबाणी आणली होती. सध्याचे महाराष्ट्रातील विद्यमान सरकार 25 जून हा दिवस संविधानात हत्या दिन म्हणून का साजरा करते? याबाबत आपण सविस्तर चर्चा करू. भारतात आणीबाणी लागू करण्यापूर्वी इंदिरा गांधींनी कणखर भूमिकेने घेतलेले निर्णय- Tough decisions taken by Indira Gandhi before imposing Emergency in India 1971 मध्ये इंदिरा गांधी … Read more

Kolhapur Shakti Peeth-शक्ती पीठला विरोध,कोल्हापूरकर एकवटले

महाराष्ट्र सरकारने नागपूर ते गोवा असा प्रचंड महामार्ग काढण्याचा प्रयत्न चालू केला आहे. या महामार्गाला शक्तिपीठ महामार्ग असे म्हटले जाते. या शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूरकरांनी प्रचंड विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 1 जुलै 2025 रोजी महामार्ग रोको आंदोलन होणार आहे. कोल्हापूरकरांचा शक्तीपीठला विरोध नागपूर ते गोवा शक्तिपीठ मार्ग काढून कुणाचे हित होणार आहे ? … Read more

Tribhasha Sutra-त्रिभाषा सूत्र नेमके काय आहे ते सविस्तर जाणून घ्या

तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शिक्षणात परिवर्तन घडवण्यासाठी कोठारी आयोगाची निर्मिती केली. या कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार भारतात त्रिभाषा सूत्र अमलात आले. हे त्रिभाषा सूत्र नेमके काय आहे ते समजून घेऊ. त्रिभाषा सूत्र आणि कोठारी आयोग- Tribhasha Sutra and Kothari Commission कोठारी आयोगाने 1968 साली त्रिभाषा सूत्र अमलात आणण्यासाठी शिफारस केली. अर्थात ही शिफारस होती. … Read more

Shivgad Fort in Dajipur-शिवगड: दाजीपूर 

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात दाजीपूर अभयारण्यात असलेला एक दुर्मिळ किल्ला म्हणजे शिवगड होय. या किल्ल्याचे अस्तित्व भग्न अवस्थेत आहे. तरीसुद्धा या किल्ल्यावर आजही जुने तटबंदी , बांधकाम केलेल्या इमारतीच्या भिंती पाहायला मिळतात. या शिवगडाविषयी थोडक्यात माहिती आपण घेऊ.

शिवगड कोठे आहे? Where is Shivgad ?

शिवगड हा महाराष्ट्रातील एक अपरिचित असा दुर्मिळ किल्ला आहे. तो कोल्हापूर जिल्ह्यात असून कोल्हापूरपासून 85 किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापूर ते दाजीपूर सुमारे 80 किलोमीटर अंतर आहे. दाजीपूर या गावापासून शिवगड अवघ्या पाच किलोमीटर अंतरापर्यंत आहे. शिवगडला जाण्यासाठी दाजीपूरहून शिवगडाजवळील डोंगरापर्यंत स्थानिक लोकांच्या कमांडर गाड्या जातात. तिथून पुढे आपल्याला चालत जावे लागते.


साधारणतः दाजीपूर पासून चालत जायचे ठरवले तर पाच किलोमीटर अंतर चालत जावे लागते. संपूर्ण प्रवास हा डोंगर परिसरात असल्याने प्रवास करताना माहितीचा एखादा माणूस असणे आवश्यक आहे. तेथील स्थानिक अनेक लोक शिवगडाचा रस्ता सांगण्यासाठी आणि माहिती सांगण्यासाठी येतात.

शिवगडाचा इतिहास:History of Shivgad

शिवगडावर काय इतिहास घडला, याबाबत फारशी माहिती कुठेही मिळत नाही; पण या गडाला शिवगड नाव आहे हे मात्र सर्वज्ञात आहे. या ठिकाणी कोण येऊन गेले? कोणती लढाई झाली का? संरक्षणासाठी या किल्ल्याचा वापर केला जात होता का? याबाबत कोणतीही माहिती इतिहासात मिळत नाही.

Onion-कांदा चिरताना डोळ्यातून पाणी का येते? जाणून घ्या यामागील कारण

आपण जेव्हा Onion चिरतो तेव्हा कांद्यातून विशिष्ट प्रकारची संयुगे बाहेर पडतात. त्या संयुगांना लॅक्रिमेटर संयुगे असे म्हणतात. या लक्रिमेटर संयुगांमुळे डोळ्यांतील नसांमध्ये जळजळ निर्माण होते आणि त्यामुळे डोळ्यांतून पाणी येते. लॅक्रिमेटर संयुगे ही अमिनो आम्लाचा एक भाग असतात. यामध्ये प्रामुख्याने मेथिओनाईन आणि सिस्टीन या संयुगांचा समावेश असतो. हीच संयुगे डोळ्यांमध्ये जळजळ निर्माण करतात आणि त्यामुळे … Read more

Hindi language is compulsory from class 1 in schools-पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची: कुणाचा फायदा? कुणाला त्रास?उघडा डोळे ,जागे व्हा

संपूर्ण भारतात एकच अभ्यासक्रम असावा असे केंद्र सरकारचे धोरण आहे. हे धोरण काही नवीन नाही ते यापूर्वीपासूनही चालू राहिले आहे. कारण अभ्यासक्रमामध्ये भौगोलिक आणि स्थानिक परिस्थितीनुसार बदल करण्याचे स्वातंत्र्य त्या त्या राज्य सरकारना दिलेले आहे. पण चालू वर्षापासून केंद्र सरकारने त्रिभाषासुत्रीकरणाचा अंमल सक्तीने करण्याचा घाट घातला आहे.या त्रिभाषासुत्रीमुळे महाराष्ट्रामध्ये मराठी, इंग्रजी या विषयाबरोबरच आता पहिलीला … Read more