पानिपतची तीन लढाया-Three Battles Of Panipat

भारताच्या मध्ययुगीन काळात बऱ्याच लढाया झाल्या.परकीय आक्रमणे झाली. अंतर्गत सत्ता संघर्षातून अनेक लढाया झाल्या. रक्तपात झाला; पण Panipat हे असे क्षेत्र आहे, की त्या मातीने सर्वात जास्त रक्तपात पाहिलेला आहे. मध्ययुगीन काळात तीन मोठ्या लढाया झाल्या. पानिपतच्या राणांगणात ही तीन युद्धे झालीत. इंद्रप्रस्थ म्हणजे आजचे दिल्ली होय. आणि हस्तिनापूर हे हरियाणा राज्यात येते. हरियाणा राज्याच्या सीमेतच कुरुक्षेत्रावर (कुरु म्हणजे कौरव) कौरव आणि पांडव यांच्यात युद्ध झाले. हे युद्धही कदाचित पानिपतच्याच युद्धभूमीवर झाले असावे, असे वाटते. या पानिपत्तमध्ये ज्या तीन लढाया झाल्यात. त्या लढायांत कोणत्याही एका शत्रूचे पूर्ण पानिपत झालेले दिसून येते. याच पानिपतच्या तीन लढायांबद्द‌ल आपण माहिती घेणार आहोत.

पानिपत कोठे आहे? Where is Panipat?

पानिपत हे ठिकाण भारतातील हरियाणा राज्यात पानिपत [Panipat) जिल्ह्यातील एक शहर आहे .पानिपत हे पानिपत जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. चंदीगड या हरियाणा राज्याच्या राजधानीच्या ठिकाणापासून उत्तरेला 161 किलोमीटर अंतरावर आहे. भारताचा मध्ययुगीन काळाचा इतिहास समजायचा असेल तर पानिपत या ठिकाणी जाऊन आजूबाजूच्या गावांची नद्यांची पाहणी केली तर ते काम अधिक सोपे होईल.

पानिपतला कसे जायचे? How to go to visit Panipat?

महाराष्ट्रातून उत्तर भारत दर्शनासाठी आपण जात असाल तर मध्यप्रदेश, राज्यस्थान, पंजाब या राज्यांतील प्रेक्षणीय स्थळे पाहत हरियाणा राज्यात जाता येते.आपला प्रवास विमान किंवा रेल्वेने असेल तर मुंबईहून दिल्लीला जाणारे विमान पकडायचे आणि दिल्लीतून बसने जायचे.नागपूर, पुणे येथूनही विमानाने दिल्लीला जाता येते. रेल्वेने जाण्यासाठी मुंबई किंवा नागपूरहून दिल्लीला एक्स्प्रेसने जाता येते. दिल्लीला मुंबईहून पोहोचण्यासाठी रेल्वेने 10 ते 12 तास लागतात. विमानाने बोर्डिंग पाल, चेक इन, चेक आउट आणि प्रत्यक्ष प्रवास असे गृहीत धरल्यास 6 से 7 तास लागतात.

दिल्ली ते पानिपत्त 100 किलोमीटर अंतर आहे. येथून बसने पानिपतला जाता येते.

संगमेश्वर-Sangmeshwar

हरिद्वार या गंगा नदीच्या ठिकाणी वसलेल्या उत्तराखंड राज्यातील ठिकाणापासून पानिपते 171 किलोमीटर अंतरावर आहे.

महाभारत कालीन कौरव-पांडव यांच्यात महायुद्ध झाले होते. त्या कुरुक्षेत्र ठिकाणापासून पानिपत 71 किलोमीटर अंतरावर आहे.

चंदीगड या पंजाब आणि हरियाणाच्या राजधानीच्या ठिकाणापासून पानिपत 161 किलोमीटर अंतरावर आहे.

1. पानिपतचे पहिली लढाई: First Battle Of Panipat

पानिपतचे पहिली लढाई बाबर आणि इब्राहीम खान लोदी यांच्यात एप्रिल 1526 मध्ये झाली. बाबर हा तुर्की मुघल होता; तर इब्राहीमखान लोदी हा दिल्लीचा सुलतान होता. बाबरची सत्ता अफगाणिस्तानमध्ये होती, तर लोदीची सत्ता दिल्लीमध्ये होती.

बाबर हा युद्ध कलेत निपुण होता. मैदानी लढाईसाठी लागणारे सर्व कसब बाबरकडे होते. त्याच्या छोटे छोटे गट होते आणि त्याने सैन्याचे तीन मुख्य भाग केलेले होते. आपल्या सैन्यापेक्षा इ‌ब्राहीम लोदीचे सैन्य दुप्पट-तिप्पट होते. याची पूर्ण जाणीव बाबरला होती. बाबरच्या सैन्यात चिवटपणा, कौशल्यपूर्ण शिक्षण झालेले सैनिक होते. सैन्यात प्रचंड एकजूट आणि शिस्तबद्धता होती. बाबरकडे केवळ 15000 ते 20000 सैन्य होते. तरी सु‌द्धा त्याने इब्राहीम लोदीला आव्हान दिले होते. इब्राहीम लोदी हा दिल्लीचा सुलतान होता.

इ.स. 1206 ते 1526 पर्यंत दिल्लीवर सुलतान शाहीची सत्ता होती. इ.स. 1451 पासून लोदी वंशाची सत्ता सुरु झाली. ती 1526 ला संपुष्टात आली.दिल्लीचा बादशाह इब्राहीम लोदी हा भक्कम होता. त्याच्याकडे प्रचंड सैन्य आणि प्रचंड धन दौलत होती . 300 वर्षाच्या परंपरेत सुलतान शाहीने दिल्लीत आपले पाय घट्ट रोवले होते. प्रचंड सैन्य आणि द‌बाव यामुळे उत्तर भारतात लोदीला आव्हान देणारे कोणीच नव्हते. लोदीकडे एक ते दीड लाख सैन्य होते.

परंतु पानिपतच्या युद्धात 40000 ते 50000 सैन्यानिशी इब्रा,हीम लोदी स्वतः आधाडीवर राहून लढत होता. लोदीकडे सैन्यबळ आणि उत्साह होता. बाबर दिल्लीवर चालून यायला निघाला आहे.असे समजल्यावर लोदीच आपले सैन्य घेऊन पानिपतला आला. बाबर मात्र याच संधीची वाट पाहत पानिपतवर तळ ठोकून होता. 21 एप्रिल 1526 मध्ये सकाळी बाबर आणि इब्राहीम लोदी यांच्यातील युद्धाला तोंड फुटले. लोदी स्वतः शस्त्र घेऊन रणांगणात उतरला होता. बाबर मात्र तंबूत तळ ठोकून सरदारांना सूचना देत होता. घनघोर युद्ध सुरु झाले. लोदीच्या प्रचंड सैन्याने जोरदार मुसंडी मारली. बाबरच्या सैन्याचा पहिला भाग आणि तिसरा भाग डावीकडून आणि उजवीकडून पुढे सरकला. दुसरा भाग मागे होता. आणि तो मधोमध होता. लोदीचे सैन्य येऊन भिडल्याशिवाय मधला भाग आक्रमण करणार नव्हता. सारे कसे ठरल्याप्रमाणेच झाले. इब्राहीम लोदीचे सैन्य मधल्या भागाच्या दिशेने आत घुसले आणि बाबरच्या सैन्याने तिन्ही बाजूंनी लोदीच्या सैन्याला घेरले. या घनघोर युद्धात दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान निर्णायक निकाल लागला. या युद्धात बाबरचा कमीत कमी नुकसानीत विजय झाला. तर लोदीचा पूर्ण पराभव झाला. या युद्धात लोदी मारला गेला. त्याचे सैन्य सैरावैरा पळू लागले. बाबराच्या सैन्याने लोदीचे जवळ जवळ 15000 से 20000 सैन्य मारले गेले. या युद्धात लोदीला मदत करणारा ग्वाल्हेरचा राजा विक्रम जीत मारला गेला.

पानिपतच्या पहिल्या युद्‌धामुळे बाबराने आपली सत्ता दिल्लीत स्थापन केली. भारतात इ.स. 1526 पासून मुघल शाही सुरु झाली; तर पानिपतच्या एकाच दिवसाच्या लढाईत सुलतानशाही ची 325 वर्षांची सत्ता संपुष्टात आली.

2. पानिपतची दुसरी लढाई. Second Battle of Panipat.

पानिपतची दुसरी लढाई दिल्लीचा बाद‌शाह अकबर आणि सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य (हेमू) यांच्यात झाले. पानिपतची दुसरी लढाई 5 नोव्हेंबर 1556 रोजी झाली.

दिल्लीचा बाद‌शाह हुमायून 24 जानेवारी 1556 रोजी मरण पावला. आणि त्याचा मुलगा अबकर दिल्लीचा बाद‌शाह झाला. त्यावेळी अकबर केवळ चौदा वर्षांचा होता. त्यामुळे या यु‌द्धाची सर्व सूत्रे बैराम खानकडे होती.

हेमचंद्र विक्रमादित्य आणि हुमायून यांच्यात झालेल्या दिल्लीच्या लढाईत विक्रमादित्य राजा विजयी झाला होता. राजा हेमचंद्र हा महापराक्रमी होता. शेरशाह सूरीचा मुलगा इस्लाम शाह याचा तो सल्लागार होता. इ.स. 1553 ते इ.स. 1556 या तीन वर्षाच्या काळात हेमू ने 22 लढाया जिंकल्या होत्या. त्यावेठी मुघल राजवट काबूल, कंदाहार, दिल्ली, पंजाब पुरती मर्यादित होती. हेमूने दिल्लीच्या मुघलांचा पूर्ण पराभव करून 7 ऑक्टोबर 1556 रोजी पुराण किल्ल्यावर आपला राज्याभिषेक करून घेतला. तेव्हा पासून हेमू हेमचंद्र विक्रमादित्य म्ह‌णून ओळखू लागला.

हेमचंद्र विक्रमादित्य ने काबूलवर हल्ला करण्यासाठी काबूलच्या दिशेने कूच केली. यावेळी 14 वर्षांचा अकबर आणि सेनापती बैराम खान काबूल मध्ये होते. भारतातील अनेक राजांनी बैरामखानला हेमचंद्र राजाशी न लढण्याचा सल्ला दिला होता; पण बैराम खानने लढाईचा निर्णय घेतला. 5 नोव्हेंबर 1556 रोजी पानिपत्त येथे अकबर आणि हेमचंद्र राजा यांच्यात पानिपत येथे युद्ध झाले. बैराम खानने लहान असल्यामुळे अकबर‌ला युद्धभूमीपासून दूर ठेवले होते. आणि जर या युद्धात पराभव झाला तर त्याला काबूलकडे पळून जाण्यास सांगितले होते.

या युद्धात हेमू मात्र स्वतः उतरला होता. ही त्याची सवीत मोठी चूक होती.5000 हत्ती, 30000 घोडेस्वार आणि तेवढेच पायदळ ‌ हेमूकडे होते, तर बैराम खानाकडे 2000 हत्ती, 15000 घोडेस्वार आणि तितकेच पायद‌ळ होते. या युद्धात ‌ हेमूचे पारडे जड होते, पण अचानक एक सुसाट बाण आला आणि हेमूच्या डोळ्यातून मेंदूतून गेला. हेमू जागीच ठार झाला आणि युद्धाला कलाटणी मिळाली,.बैराम खानचा अर्थात अकबरचा विजय झाला. हेमूचे निम्म्याहून अधिक सैन्य गारद झाले . हेमू दिल्लीचा अल्पकाळ बाद‌शाहा ठरला, पण या यु‌द्धामुळे अकबराचे दिल्लीतील स्थान अधिक बळकट झाले. हेमचंद्र विक्रमादित्य राजाचा विजय झाला असता तर भारताचा इतिहास बद‌‌लला असता.

3. पानिपतचे तिसरी लढाई Third Battle of Panipat:

पानिपतचे तिसरी लढाई अहमद‌‌शाह अब्दाली आणि मराठे यांच्यात 14 जानेवारी 1761 रोजी रोजी झाली. ऑक्टोबर 1760 मध्येच सदाशिवराव पेशवे, विश्वासराव (नानासाहेब पेशव्याचा मुलगा) दत्तात्री शिंदे राणोजी शिंदे , मल्हारराव होळकर अशी बलाढ्य माणसे उत्तरेकडे मराठेशाही आणखी मजबूत करायला चालले. मराठे एका मागून एक भाग जिंकत चालले होते. मराठे उत्तरेकडे येणार हे समजल्यावरच नजिबखानाने अफगाणिस्तानच्या अब्दालीला पाचारण केले होते. दिल्ली जिंकण्यापूर्वी मराठ्यांचा शूर योद्धा दत्ताजी शिंदे रणांगणात पडला होता. नजीब खानाने द‌त्ताजीचे मुंडके कापून भाल्यात अडकवून फिरवले होत . याचा बदला मराठ्यांनी घेतला आणि दिल्ली घेतली. अफगाणिस्तानकडून अब्दाली येत असल्याची चाहूल लागताच मराठे पानिपतच्या दिशेने सरकू लागले. मराठ्यांकडे दीड लाखाहून अधिक सैन्य होते, तर अब्दालीकडे 30000 सैन्य होते. यमुनेच्या पलीकडे मराठे आणि अलीकडे अब्दाली होता. अब्दालीने शांत डोक्याने मराठ्यांची कोंडी केली. हळूहळू रसद कापली.मराठ्यांची उपासमार होऊ लागली. युद्धातून माघार घेण्याचा सल्ला मल्हारराव होळेकरांनी दिला होता; पण सदाशिव भाऊंनी ऐकले नाही. अब्दालीने पहिला हल्ला केलाच नाही.कोंडी करत मराठ्यांनाच हल्ला करण्यास भाग पाडले. उपासमारीने मराठ्यांवर निर्णायक लढ्याची वेळ आली. आयत्या वेळी मल्हारराव होळकरांनी आपले सैन्य माघारी घेऊन दिल्लीच्या दिशेने कूच करून दक्षिणेकडे निघाले. सदाशिवराव भाऊ आणि शिंद्यांनी जोरदार लढाई केली. 14 जानेवारी 1761 मध्ये निर्णायक लढाई झाली. या लढाईत मराठ्यांचा पूर्ण पराभव झाला. लढाई संपल्यावरही 15000 अब्दालीचे सैन्ये मराठ्यांच्या मागावर सुटून 50000 मराठे सैन्य कापले गेले. या लढाईत पूर्ण सैन्य गारद झाले महादजी शिंदे, समशेरबहाद्दर नाना फडणवीस सारखे काही पळून गेले तेवढेच वाचले. या लढाईमुळे मराठ्यांचे पूर्ण पानिपत झाले. उत्तर भारतात दबदबा असलेल्या मराठ्यांची खूप वाईट अवस्था झाली.

हे सुद्धा आवर्जून वाचा

  1. दिल्लीचा लाल किल्ला: Red Fort
  2. राष्ट्रपतीभवन: दिल्ली / Rashtrapati Bhavan Delhi
  3. इंडिया गेट: दिल्ली: India Gate

 

Leave a comment