भारतीय वास्तुकला आणि संस्कृतीला एक वैभवशाली परंपरा आहे. भारतातील अनेक वास्तू गडकोट किल्ले, म्युझिअम्स त्याचे साक्षीदार आहेत. अशाच परंपरेतील एक वास्तू म्हणजे इंडिया गेट होय. या इंडिया गेटची आता आपण माहिती घेणार आहोत.
इंडिया गेट कोठे आहे? Where is India Gate?
इंडिया गेट ही सुप्रसिद्ध वास्तू भारताची राजधानी दिल्ली येथे आहे.
स्थळाचे नाव : इंडिया गेट’
ठिकाण : नवी दिल्ली
स्थापना : 10 फेब्रुवारी 1921
बांधकाम कालावधी : 10 वर्षे
सर्वांसाठी खुले : 12 फेब्रुवारी 1931
उंची : 42 मीटर.
स्थापत्य विशारद : एडविन लुटएन्स,
निर्मिती : ब्रिटिश सरकार
शिलान्यास ; ड्युक ऑफ कॅनॉट.
नक्कल (काॅपी): पॅरिस येथील आर्क द ट्रायम्फे.
इंडिया गेटच्या जवळची ठिकाणे: Places Near India Gate
* कुतुबमिनार ते इंडिया गेट अंतर 11 किल्लोमीटर आहे.
* लाल किल्ल्यापासून इंडिया गेट 6.6 किलोमीटर आहे.
* प्रसिद्ध जामा माशिद ते इंडिया गेट अंतर 6 किलोमीटर
* इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ते इंडिया गेट अंतर 14 किलोमीटर आहे.
* अक्षरधाम ते इंडिया गेट अंतर 8.6 किलोमीटर आहे.
* राजघाट या इंदिरा स्मृतिस्थळापासून इंडिया गांधी गेट 4.6 किलोमीटर आहे.
इंडिया गेट बांधणीमागील हेतू: Motives Behind the Constitution of India Gate
प्रत्येक वास्तू बांधणी पाठीमागे काही ना काही कारण निश्चित असते. शाहजहानने आपली लाडकी पत्नी मुमताज महलच्या स्मृतीप्रित्यर्थ आग्रा येथे ताजमहाल बांधला.
कुतुबुद्दीन ऐबकने मुहम्मद घुरीवर मिळवलेल्या विजयाप्रीत्यर्थ कुतुबमिनार बांधला .तसाच उद्देश इंडिया भेट बांधणीमागील आहे. तो उद्देश म्हणजे——
1914 ते 1919 या सहा वर्षाच्या प्रदीघ कालावधीत पहिले महायुद्ध झाले. या महायुद्धाचे चटके संपूर्ण जगाला बसले.1914 ते 1919 या कालावधीत भारत स्वतंत्र नसला तरी अनेक भारतीय लोक उदरनिर्वाहासाठी इंग्रजांच्या लष्करात सामील होते.अनेकांना या युद्धात शहीद व्हावे लागले. बंगालच्या युद्धात तर अनेक भारतीय सैनिक मृत्युमुखी पडले.1919 साली तर अँग्लो-अफगाण युद्धात 80 हजार भारतीय सैनिक शहीद झाले .या सर्व सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ इंडिया गेट हे स्मारक उभारले गेले.
इंडिया गेटचे नाव अखिल भारतीय युद्ध स्मारक [All India War Memorial] असे आहे.
अमर जवान ज्योती: Amar Javan Jyoti
इंडिया गेट हे पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या जवानांचे अर्थात हजारो अज्ञात जवानांचे हे स्मारक आहे.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1971 साली इंडिया गेटच्या कमानीखाली अमर जवान ज्योती निर्माण केले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1971 साली बांगलादेशच्या मुक्तीसाठी लढाई झाली. भारताने या युद्धात उडी मारली होती. या युद्धात सॅम बहाद्दूर हे लष्कर प्रमुख होते. त्यांनी आपल्या युद्ध कौशल्याने भारताला मोठा विजय मिळवून दिला होता. या युद्धाबाबत भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सॅम बहाद्दूर यांच्यात युद्धाच्या तंत्राबाबत थोडा संघर्ष निर्माण केला होता. मला पूर्ण स्वतंत्र सोडल्याशिवाय भारताला हे युद्ध जिंकता येणार नाही ,हे बहाद्दूर यांनी स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे इंदिरा गांधींनी त्यांना स्वातंत्र्य दिले आणि सॅम बहादूर यांनी भारताला युद्ध जिंकून दिले. या युद्धात शहीद भारतीय जवानांसाठी इंडिया गेटच्या कमानीखाली अमर जवान ज्योती स्थापित करण्यात आली.सैनिकांच्या स्मरणार्थ येथे एक बंदूक (रायफल) उभी केलेली आहे. या बंदुकेच्या टोकावर सैनिकांची टोपी ठेवली आहे. येथे सदैव ज्योती तेवत असतात. भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान या अज्ञात सैनिकांना पुष्कचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहतात.या गेटच्या भिंतीवर हजारों सैनिकांची नावे खोदलेली आहेत. सर्वांत वरच्या बाजूला इंग्रजीतून काही मजकूर खोदलेला आहे.
त्या मजकुराचा अर्थ असा——
भारतीय शहीद जवानांची, जे फ्रान्स, प्लँडर्स , मेसोपोटेमिया, पर्शिया, पूर्व आफ्रिका इतर त शहीद झालेत, त्या सन्मानित सैनिकांची नावे येथे खोदली आहेत. तसेच त्यांनी अफगाण सुद्धात आपला प्राण गमवावा लागला, त्यांची नावे खोदलेली आहेत.
ब्रिटीश सरकारने शहीद जवानांसाठी स्मारक उभारले. पण त्यांनी या लेखातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली’ असे म्हटले असते तर तर बिघडले नसते.. निर्दयी ब्रिटीश सरकारकडून अधिक अपेक्षा करणे पण चुकीचे ठरेल.
इंडिया गेटची रचना आणि बांधकाम:Design and Construction of India Gate:
1914 ते 1919 या कालावधीत चाललेल्या पहिल्या महाद्धात बलिदान पडलेल्या भारतीय जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ इंडिया गेट हे स्मारक नवी दिल्लीत मध्यवर्ती ठिकाणी आहे. 10 फ्रेब्रुवारी 1921 साली सुरू झालेल्या या इंडिया गेटचे बांधकाम 12 फेब्रुवारी 1931 रोजी पूर्ण झाले. हे बाधकाम संपूर्ण दगडी असून यासाठी वाळू,चुना, सिमेंट यांचा वापर केला आहे. गेटचे नाव ऑल इंडिया वॉर मेमोरियल असे होते; पण नंतर हे इंडिया गेट असे रूढ झाले.
या इंडिया गेटची उंची 42 मीटर आहे, तर रूंदी 9 मीटर आहे. गेटच्या कमानीखाली अमर जवान ज्योती 15 चौरस फूट जागेत आहे. गेटच्या सभोवारचा परीसर मोकळा आहे. रात्रीच्या वेळात कारंजात गेटचे सौंदर्य अगदी खुलून दिसते.
सन 2016 साली मला भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार. त्यावेळी भारत सरकारने आमची म्हणजे सर्व राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित शिक्षकांची एक दिवसांची दिल्ली दर्शन ट्रीप काढली होती. त्या निमिताने आम्हाला इंडिया गेट जवळून पाहता” आला.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त लष्करी परेड दरवर्षी आयोजित केली जाते.ही परेड राष्ट्रपती भवनापासून सुरु होते. इंडिया गेटवरून लाल किल्ल्यापर्यंत जाते.