आग्ऱ्याचा किल्ला / Agra Fort

पानिपतच्या पहिल्या लढाईत म्हणजे बाबर आणि इ‌ब्राहीम लोदी (दिल्लीचा सुलतान) यांच्या लढाईत बाबराचा विजय झाला आणि एका दिवसात 300 वर्षांची परंपरा असलेली सुलतानशाही नष्ट झाली. बाबराने आपल्या राज्याची राजधानी आग्रा येथे इ. स. 1526 मध्ये स्थापित केली. बाबर नंतर त्याचा मुलगा हुमायून गादीवर आला. त्यानेही आग्र्यातूनच राज्यकारभार केला. हुमायूनच्या अकाली मृत्यूमुळे वयाच्या 13 व्या वर्षी त्याचा पुत्र अकबर गादीवर आला. त्यानेही 1556 ते 1571 या काळात आग्रा हीच राजधानी ठेवली. इ.स. 1573 मध्ये आग्र्याचा लाल किल्ला बांधून पूर्ण झाला.त्या Agra Fort विषयी आपण आता अधिक माहिती घेणार आहोत.

गडाचे नाव: आग्र्याचा किल्ला / Agra Fort

गडाचा प्रकार: भुईकोट किल्ला.

समुद्र सपाटीपासून उंची: 178 मीटर

गडाचे क्षेत्रफळ. :98 एकर

ठिकाण : आग्रा

स्थापना. : अकरावे शतक.

दिल्लीहून अंतर : 214 किमी

चढाईची श्रेणी: सोपी

सध्याची स्थिती : चांगली.

राज्य : उत्तर प्रदेश

आग्र्याचा लाल किल्ला पाहायला कसे जायचे? How to go to see Red Fort Agra ?

Agra fort

उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या आग्रा या शहरात आग्र्याचा लाल किल्ला आहे. या किल्ल्यापासून 4 किलोमीटर अंतरावर ताजमहाल आहे. दिल्ली से आग्रा अंतर 260 किलोमीटर आहे. दिल्लीहून आग्र्याला रेल्वेने किंवा बसने जाता येते. उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद शहरापासून आग्रा 45 किलोमीटर अंतरावर आहे. येथेच बसने एक तासात आग्र्याला जाता येते.

मथुरेतील वृंदावन पाहून आग्र्याचा लाल किल्ला पाहायला जाता येते. मथुरा ते आग्रा 60 किलोमीटर अंतर आहे.

ताजमहाल/ Tajmahal agra

आग्र्याचा किल्ल्याचे नाव काय? What is the name of Fort Agra ?

आग्र्याच्या किल्ल्याला वेगवेगळ्या काळात वेगवेगळी नावे दिलेली आहेत. सुरु‌वातीला या गडाचे नाव बादलगड (Badalgad) असे होते. बादलगड हे नाव पाहता हे नाव चौहान घराण्याची सत्ता येथे असताना त्यांनी बादलगड असे नाव ठेवले असावे. सुलतान शाहीचा पराभव करून (पानिपतच्या 1526 च्या लढाईत) आग्र्याचा बादलगड बाबर ताब्यात घेतला. तेव्हा त्यांना या गडावरील संपत्तीत एक मौल्यवान कोहिनूर हिरा सापडला. तेव्हापासून हा किल्ला कोहिनूर हिरा या नावाने ओळखू लागला. अकबराने या किल्ल्याची दुरुस्ती करून नवे नाव दिले. ते म्हणजे किल्ला-ए-अकबरी होय. या किल्ल्याला वापरलेल्या लाल रंगाच्या दगडांमुळे या किल्ल्याला लाल किल्ला असेही म्हणतात.

आग्याच्या लाल किल्ल्याचा इतिहास: History of Agra’s Red fort:

सध्या जो आग्र्याचा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो, तो अकबर बाद‌शाहने बांधलेला आहे. सन 1983 साली युनेस्कोने हा किल्ला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. अकराव्या शतकात हा किल्ला रजपूत चौहान घराण्याकडे होता .त्यानंतर गझनीच्या महमूदने किल्ल्यावर कब्जा घेतला. दिल्ली सुलतानशाहीकडे जवळ जवळ 300 वर्ष होती. या काळात त्यांनी अनेक किल्ल्यांची दुरुस्ती केली. दिल्लीचा तत्कालीन सुलतान सिकंदर लोदी (1487 ते 1517) याने आग्र्याचा किल्ला सन 1504 मध्ये दुरुस्त करूत घेतला इ. स. 1506 मध्ये सिकंदर लोदीने राजधानीचे शहर बद‌लले आणि ते आग्र्याला आणले. आणि सुलतान शाहीचा कारभार आग्र्याच्या लाल किल्ल्यातून सुरु झाला. सन 1517 मध्ये सिकंदर लोदीचा याच किल्यावर मृत्यू झाला. 1517 मध्ये इब्राहीम लोदी हा सुलतान शाहीचा प्रमुख झाला. त्याने आपल्या काळात [1517 ते 1526] गडावर आणखी सुधारणा केल्या. इ. स. 1526 मध्ये बाबर आणि दिल्लीचा सुलतान इब्राहीम लोदी यांच्यात पानिपत येथे पानिपतची पहिली लढाई झाली. या लढाईत एकाच दिवसात बाबराने लोदीचा पराभव केला आणि सुलतानशाहीने तीनशे वर्षांची सत्ता गमावली. त्यावेळी आग्र्याचा किल्ला बाबराकडे आला. बाबराने येथील अमाप संपत्ती लुटली आणि या संपत्तीत कोहिनूर हिरा सापडला. त्यामुळे आग्र्याच्या किल्लाला कोहिनूर हिरा असे नाव पडले. सन 1530 मध्ये मुघल बादशाह हुमायून गादीवर आला. त्याचा राज्याभिषेक आग्र्याच्या लाल किल्ल्यावरच झाला.

Agra fort

हुमायून आणि शेरशाह सूरी यांच्चात लढाई झाली. या लढाईत हुमायूनचा पराभव झाला आणि काही काळ मुघलांना वाईट दिवस आले.

पानिपतची दुसरी लढाई अकबर आणि हेमचंद्र विक्रमादित्य यांच्यात झाली. 5 नोव्हेंबर 1556 रोजी झालेली पानिपतची लढाई एकाच दिवशी संपुष्टात आली. 3 वर्षात 22 लढाया जिंकणारण हेमचंद्र विक्रमादित्य याच्या डोळ्यात बाण घुसून मृत्यू झाला आणि अकबरचा सेनापती बैराम खान याने ही लढाई जिंकली. त्यामुळे पुढील काळात अकबराची सत्ता फोफावत गेली. 1858 मध्ये अकबराने आग्र्याचा किल्ला अकबरच्या ताब्यात आला.

सम्राट अकबरने उत्तर भारतात आपले चांगले बस्तान बसवल्यावर आग्रा ही आपली राजधानी करण्याच्या दृष्टीने हालचाली चालू केल्या. इ.स. 1565 मध्ये या किल्ल्याची पूर्णत: पुनर्बाधणी करण्याचा अकबरने निर्णय घेऊन प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली. या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी 14,44,00 कामगार लागले. 1573 रोजी किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले. या किल्ल्याच्या बांधकामासाठी लाल रंगाचे दगड वापरले होते. त्यामुळे या किल्ल्याला लाल किल्ला असे नाव पडले. अकबराने मात्र या किल्ल्याला किल्ला- ए-अकबरी असे नाव दिले. शाहजहानने याच आग्र्यात मुमताज महलच्या स्मृतिप्रीत्यर्थ ताजमहाल बांधला आणि आग्र्याची ओळख संपूर्ण जगात पसरली. औरंगजेबने आपल्या बापाला म्हणजे शाहजहानला याच किल्ल्यात डांबून ठेवले आणि शाहजहानने याच किल्ल्यात अंतिम श्वास सोडला.

छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब बादशाहच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आग्र्याला 1666 साली गेले होते.त्यावेळी दरबारात शिवाजी महाराजांची मानहानी केली होती; पण शिवाजी महाराजांनी बाणेदारपणे औरंगजेबला याच महालात खडे बोल सुनावले आणि दरबार सोडून शिवाजी महाराज आपल्या निवासस्थानी निघून आले. मुघल बादशहाला चढ्या आवाजात बोलणारे फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे दोनच राजे होते. अखंड मुघलशाहीला त्यांचा धसका होता.

आग्र्याच्या किल्ल्यातील प्रेक्षणीय स्थळे: Famous Points of Agra Fort:

1) अमरसिंग राठोड प्रवेशद्वार Amar singh Rathod Gate

Amar Singh Rathod Gate

आग्र्याच्या किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी भव्य प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वासला अमर सिंह राठोड गेट म्हणतात.बादशाह शहाजहानच्या काळात मुख्य सेनाधिकारी[Chief Commander म्ह‌णून हा अमरसिंह राठोड काम करत होता. 1644 मध्ये या राठोडने 65 फूट उंचावरून घोड्यावरून किल्ल्याच्या तटावरून शाहजहानच्या मंत्र्याचा खून करून फरार झाला होता. अमरसिंहने शाहजहानसाठी युद्धात दिलेल्या योगदानामु‌ळे या मेन गेटला त्याचे नाव दिले आहे.

इंडिया गेट: दिल्ली: India Gate

2. जहांगीर महाल: Jahangir Mahal:

Jahangir Mahal

किल्ल्याच्या आत प्रवेश केल्यानंतर एक सुंदर महाल दिसतो. या महालाला जहांगीर महल असे नाव दिले आहे. अकबर‌चा मुलगा जहांगीर बादशाह बनल्यानंतर त्याने हा महाल बांधून घेतला. त्याचे हे निवासस्थान असल्यामुळे या निवासस्थानाला जहांगीर महाल असे नाव दिले आहे. जहांगीरचा एक लाडका मुलगा सलीम होता. त्याला अंघोळ करण्यासाठी पूर्ण द‌गडात खोदून एक मोठा बाथ टब बनवला होता. तो बाथ टब आजही पाहायला मिळतो.

3. अकबरी महल : Akbari Mahal:

Akbari Mahal

बाद‌शाह अकबराने आपल्यासाठी एक सुंदर महाल बनवला होता. त्याला अकबरी महल असे नाव दिले होते. आज या महालाचे केवळ अवशेष पाहायला मिळतात. या ठिकाणी अकबर काळातील पिण्याच्या पाण्याची एक खोल विहीर आहे.

4) नौबत खाना Noubat khana:

अकबर बाद‌शाहाच्या काळातील एक सुंदर आणि कलाकुसर केलेली इमारत म्हणजे नौबन खाना होय.
ही इमारत आजही सुस्थितीत पाहायला मिळते.

(5) रंगमहल : Rang Mahal:

Rang Mahal

अकबराच्या काळात संगीताला खूप महत्त्व होते. अकबराच्या नवरत्नांपैकी एक होता तानसेन. तत्कालीन सर्वोत्तम गायक म्हणजे तानसेन होय.त्याच्या गायकीचे अनेक कार्यक्रम या सुंदर आणि कलाकुसरीने नटलेल्या रंगमहालात व्हायचे.

(6) ताजमहाल खिडकी : Taj Mahal Window

औरंगजेबने ज्या महालात शाहजहानला कैद करून ठेवले होते, या महालातील एका खिड‌कीतून ताजमहाल दिसतो. शाहजहानने आपला अखेरचा श्वास या खिडकीतून ताजमहाल पाहत मुमताजची आठवण काढत सोडला होता.

हे सुद्धा आवर्जून वाचा

  1. दिल्लीचा लाल किल्ला: Red Fort
  2. राष्ट्रपतीभवन: दिल्ली / Rashtrapati Bhavan Delhi

Leave a comment