भोपाल हे मध्यप्रदेशची राजधानीचे शहर होय. राजीव गांधी पंतप्रधान असताना भोपाळ हे शहर वायूगळतीमुळे खूप गाजले होते. 3 डिसेंबर 1984 रोजी भोपाळ शहरात युनायटेड कार्बाइड कंपनीच्या एक टँकमधून मिथाईल आयसोसायनाईट (M.I.C.) वायूच्या गळतीत सुमारे 20000 लोक मृत्युमुखी पडले आणि 50,000 लोक जखमी झाले होते .या वायुगळीमुळे भोपाळ दुर्घटनेची बातमी जगभर पसरली होती. त्याच भोपाळ मधील काही प्रतिद्ध ठिकाणांची आपण ओळख करून घेणार आहोत.
भोपाळची संक्षिप्त माहिती: Brief Information of Bhopal
ठिकाणाचे नाव: भोपाळ
प्रसिद्धी: मध्य प्रदेशची राजधानी
लोकसंख्या : 26,24,860
भाषा : हिंदी
नागपूरहून अंतर : 352 किलोमीटर
कसे जायचे भोपाळला ?: How to go to see Bhopal?
1. भोपाळ ही मध्य प्रदेशराची ची राजधानी असल्याने देशातील कोणत्याही विमानतळ असलेल्या शहरातून भोपाळला जाता येते. मुंबई ते भोपाळ विमान तिकीट 3000 ते 4000 रु च्या दरम्यान असू शकते.
2. मुंबई ते भोपाळ रेल्वे तिकीट 500 रु. पासून सुरु होते. आपण कोणत्या वर्गातून प्रवास करतो, त्यावर तिकीट दर अवलंबून असतो.
१) मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती या शहरांतून बसने सुद्धा जाता येते. 500 किलोमीटर पेक्षा अंतर जास्त असेल तर बस आरामदायी आणि sleeper coach असेल तर अधिक उत्तम.
भोपाळ हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे ? What is special about Bhopal?
भोपाळ हे शहर सर्वात जास्त 1984 साली झालेल्या वायू गळतीमुळे प्रसिद्ध झाले. याशिवाय भोपाळ ही मध्यप्रदेशची राजधानी आहे. या शहरात मध्यप्रदेशातील सर्व प्रमुख प्रशासकीय कार्यालये आहेत. पर्यटकांसाठी अप्पर लेक, लोअर लेक, जामा मशिद, मोती मशिद इत्यादी ठिकाणे प्रसिद्ध आहेत. या ठिकाणांना हजारो पर्यटक भेट देत असतात.
1. अप्पर लेक Upper Lake, Bhopal:
अप्पार लेक या तलावाचा खूप मोठा इतिहास आहे. हा तलाव शहरातील सर्वात मोठा आणि जुना तलाव आहे. सुमारे अकराव्या शतकात राजा भोज याने हा तलाव बांधून घेतला. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश किल्ले भोज राजांनीच बांधले आहेत. हा तलाव भोज राजाने बांधून घेतला आहे. म्हणून या तलावाला भोजताल असेही म्हणतात. भोपाळच्या शहरवाशीयांचे पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत म्हणजे हा अपर लेक (Upper Lake) होय.
2. लोअर लेक [Lower Lake, Bhopal]:
भोपाळ मधील हा एक छोटासा तलाव आहे. या तलावाला भोपाळमधील शाहूपुरा तलाव असेही म्हणतात. भोपाळ शहराच्या सुशोभिकरणासाठी इ.स. 1794 मध्ये हा लोअर लेक बांधणात आला. लोअर लेक हा अप्पर लेकच्या पूर्वेस आहे. दोन तलावांच्या मध्ये मातीचा बांध आहे. या तलावाची पातळी अप्पर लेक पेक्षा खाली आहे .म्हणून या तलावाला Lower Lake असे म्हणतात.
3. मोती मशिद, भोपाळ Moti Masjit, Bhopal:
हे मोती मशिद करसिया बेगमची मुलगी सिकंदर जहाँ बेगम हिने 1844 ते 1868 च्या दरम्यान बांधून घेतले होते .दिल्ली येथील जामा मशिदची रचना आणि या मोती मशिदीची रचना यात बरेच साम्य आहे. मशिदीचा गडद लाल रंग या मशिदला अधिकच शोभून दिसतो.
हे सुद्धा आवर्जून वाचा