महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात नाशिक पासून 36 किलोमीटर अंतरावर Trimbakeshwar तालुक्यात Trimbakeshwar या ठिकाणी त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. संपूर्ण भारतात बारा ज्योतिर्लिंग मंदिरे प्रसिद्ध आहेत. फार प्राचीन काळी (कालावधी निश्चित सांगता येत नाही) म्हणजे महाभारत काळापूर्वी शिव आणि पार्वती ही महान व्यक्तिमत्त्वे भारतीय संस्कृतीत उदयास आलीत. शिव हा आदिम; तर पार्वती ही ब्राह्मण कन्या. या दोन भिन्न संस्कृतीचा मिलाप म्हणजे शिव पार्वती विवाह होय. शिवाने अखंड भारतातील सामाजिक विषमतेची दरी कमी करण्यासाठी आपले आयुष्य वेचले पार्वतीची शिवाला खंबीर साथ मिळाली .शिवाचीच सर्वांत जास्त मंदिरे भारतात आहेत. त्यांतील बारा ज्योतिर्लिंग मंदिरे यांना वेगळे स्थान आहे. या बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकीच त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाचे मंदिर आहे. त्या ज्योतिर्लिंग मंदिराविषयी आपण या लेखातून अधिक माहिती घेणार आहोत.
* भारतातील बारा ज्योतिर्लिंग मंदिरे: Twelve Jyotirling Temples.
1.) त्र्यंबकेश्वर मंदिर – त्र्यंबकेश्वर मंदिर, जिल्हा, नाशिक, महाराष्ट्र.
२) घृष्णेश्वर मंदिर – वेरुळ, ता. खुलताबाद जि. छत्रपती संभाजीनगर , राज्य महाराष्ट्र
३) औंढा नागनाथ मंदिर – औंढा नागनाथ, जिल्हा: हिंगोली, महाराष्ट्र.
4) भीमाशंकर मंदिर – खेड, जिल्हा: , महाराष्ट्र.
5) केदारनाथ मंदिर – रुद्रप्रयाग जिल्हा. उत्तराखंड
6) सोमनाथ मंदिर – गीर, गुजराध
7) माल्लकार्जुन मंदिर- श्रीशैल्य, आंध्रप्रदेश
8) महाकालेश्वर मंदिर – उज्जैन, मध्यप्रदेश
१) ओम्कारेश्वर मंदिर – ओम्कारेश्वर, खंडवा जिल्हा,मध्यप्रदेश.
10)परळी-वैजनाथ:परळी,जिल्हा:बीड, महाराष्ट्र.
11) रामेश्वर मंदिर;रामनाथपुरम, तामिळनाडू
12) काशी विश्वेश्वर – वाराणसी, उत्तरप्रदेश
वरील बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी पाच ज्योतिर्लिंग मंदिरे महाराष्ट्रात आहेत.
* त्र्यंबकेश्वरला कसे जायचे ? How to go to Trimbakeshwar?
* नाशिक जिल्ह्यात असलेल्या त्र्यंबकेश्वर गावी हे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. नाशिक या जिल्ह्याच्या ठिकाणापासून त्र्यंबकेश्वर 86 किलोमीटर अंतरावर आहे.
तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर नाशिक रोडला रेल्वे स्टेशन जात आहे तेथे उतरून तेथून पुढे पालघरतून त्र्यंबकेश्वरला येते.जाता
त्र्यंबकेश्वर ते पालघर 116 किलोमीटर अंतर आहे. बस, मोटारने हा प्रवास करता येतो.
* त्र्यंबकेश्वर मंदिर माहिती: Information of Trimbakeshwar Temple
त्र्यंबकेश्वर मंदिर फार पौराणिक असून भगवान शिवाचे हे प्रतिकात्मक ज्योतिर्लिंग मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेण्यापूर्वी येथील कुशावत तीर्थाच्या ठिकाणी भक्त लोक अंघोळ करतात. काही लोक येथे हातपाय धुतात आणि दर्शनाला जातात. पहाटे साडेपाच वाजल्यापासून दर्शनाला रांग लागलेली असते.त्र्यंबकेश्वर हे गोदावरी नदीचे उगमस्थान असल्याने आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
* त्र्यंबकेश्वर मंदिराला इतिहास: History of Trimbakeshwar
त्र्यंबकेश्वर मंदिराला खूप मोठा इतिहास आहे. सुलतान शाही आणि मुघलशाहीच्या पूर्वी येथे भगवान शिवाचे मंदिर होते. या परकीयांच्या म्हणजे सुलतानांच्या आणि मुघलांच्या आक्रमणामुळे मंदिराचे नुकसान झाले होते. आणि कालानुरूप जीर्ण होत आले होते. ऊन, वारा, पाऊस याच्या माऱ्यामुळे पुरातन मंदिराची अवस्था बिकट झाली होती. त्यामुळेच या मंदिरात पेशवाईच्या काळात जीर्णोद्धार झाला.
पेशवाईत तिसरा पेशवा बाळाजी बाजीराव पंतप्रधान असताना त्याने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा घाट घातला. बाळाजी बाजीराव (तिसरा) म्हणजेच नानासाहेब पेशवे होय. यांच्या काळात तीर्थाटन आणि कर्मकांड याला उधाण आले होते. अब्दालीबरोबर पानिपत याठिकाणी झालेल्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला होता. हा पराभव मराठ्यांच्या जिव्हारी लागला होता. नानासाहेब पेशवे यांनी युद्ध नीती पेक्षा धार्मिकता अधिक जोपासली. पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव होण्याच्या अनेक कारणांपैकी धार्मिकता हे एक कारण आहे.
इ स. 1755 साली नानासाहेब पेशवे यांनी त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या बांधकामाची पायाभरणी केली होती. हे मंदिर पूर्ण व्हायला सुमारे 31 वर्षे लागली. म्हणजे 1786 साली मंदिर बांधून पूर्ण झाले. या मंदिराच्या जीर्णोद्धाराला सुमारे 16 लाख रुपये त्यावेळी खर्च आला होता.
इ स. 10 व्या, अकराव्या शतकाने हेमाडपंथी बांधकामाची मंदिरे बांधण्यास सुरु झाली. या पद्धतीची अनेक मंदिरे महाराष्ट्रात आहेत. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेबर येथील मंदिर सुद्धा हेमाडपंथी बांधकामाचे आहे.
निवृत्तनाथाची समाधी: Tomb of Nivruttinath
. संत ज्ञानेश्वर यांचे ज्येष्ठ बंधू आणि गुरु निवृत्तीनाथ यांची समाधी त्र्यंबकेश्वर येथे आहे. विठ्ठल पंतांच्या चार मुलांच्या समाध्या चार ठिकाणी आहेत. संत चांगदेव यांचे शिष्य या त्र्यंबकेश्वर येथे राहत होते. त्यांच्या कितीतरी पिढ्यांनी निवृत्तीनाथाच्या समाधीची पूजा आणि देखबाल केली.
गोदावरी नदीचे उगमस्थान: origin of Godavari
महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी म्हणून गोदावरीला मान मिळतो. या या नदी नदीची लांबी 1465 km असून इतर सर्व नद्यांपैक्षा (महाराष्ट्रातील) गोदावरीची लांबी जास्त आहे. म्हणूनच तिला महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी म्हणतात. या नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर येथे असून हे उगमस्थानाचे ठिकाण समुद्र सपाटीपासून 1067 मीटर उंचीवर आहे. या नदीला उगमस्थानाच्या ठिकाणी गौतमी गोदावरी असेही म्हटले जाते. गोदावरी नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाते. म्हणून या नदीला पश्चिम वाहिनी नदी असे म्हणतात. गोदावरी नदी महाराष्ट्र, छत्तीसगड तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडिशा , मध्यप्रदेश या राज्यातून वाहत वाहत शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते.
* ब्रह्मगिरी पर्वत: Brahmagiri Mountain.
गोदावती नदीच्या उगमस्थानाच्या नजिकच येथे एक डोंगर आहे. या डोंगराला ब्रह्मगिरी पर्वत असे म्हणतात. या पर्वतावर असलेल्या एका मठात फार वर्षापूर्वी गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी हे दोघेही राहत होते. यांच्या दीर्घकाल वास्तवा मुळेच गोदावरी नदीला गौतमी गंगा असेही म्हटले जाते. गोदावरीला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते. दक्षिणेतील ही सर्वांत लांब नदी आहे, म्हणून तिला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते.
त्र्यंबकेश्वर बाबत आख्यायिकाः
भगवान शिवाने आपल्या समर्पक भावनेने केलेल्या कार्याचे फलित म्हणून भगवान ( महामानव) शिवाचा मंदिर रुपाने संपूर्ण भारतात उद्धार केला आहे. परंतु प्रत्येक तीर्थक्षेत्रेच्या ठिकाणावर किंवा धार्मिक स्थळांच्या ठिकाणावर आधारित अनेक कथा, आख्यायिका, चमत्कार, दंतकथा रचून त्या धार्मिक स्थळाचे मूळ पावित्र्य, इतिहास आणि पार्श्वभूमी गौण ठरवून कपोलकल्पित कथा रचलेल्या आहेत. अशा कथांवर फारसा विश्वास न ठेवता भगवान शिवाच्या कार्याचा यथोचित सन्मान करण्यासाठी आपण जाल, अशीच अपेक्षा आहे .