Panchmahabhuta / पंचमहाभूते

विश्व म्हणजे कण (अणू, रेणू), ऊर्जा आणि पदार्थ असे असले तरी विश्वाची व्याप्ती अनंत असून एका महास्फोटातून विश्वाची निर्मिती झाली आहे. ग्रह, तारे, अवकाश या साऱ्यांनाच ब्र‌ह्मांड म्हणतात. ब्रह्मांड हे अपरिमित आहे. या ब्रह्मांडातील किवा विश्वातील असणाऱ्या Panchmahabhuta विषयी आपण माहिती घेऊया. ब्रह्मांडाच्या निर्मितीतूनच पंचमहाभूतांची उत्पत्ती झाली आहे. या पंच महाभुतातूनच संजीवसृष्टीचा जन्म झाला. तेच समजून घेऊया.

पंचमहाभूते – Panchmahabhuta:

1) पृथ्वी-Earth

२) आप (जल) – Water

3) अग्नी (ताप) – Fire

4) वायू – Gas

5) आकाश – sky

ब्रह्मांडातील या पंचतत्त्वांपासून किंवा पंचमहाभुतापासून पृथ्वीवरील सर्व पदार्थ, जीव, जैविक- अजैविक घटक तयार झालेले आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू अणि आकाश या पंचमहाभुतांवर दृष्टिक्षेप टाकल्यास ही पंचमहाभूते सूर्यमालेशी संबंधित आहेत. ब्रह्मांडात अगणित सूर्यमाला आहेत. आणि ब्रह्मांडाची लांबी, रुंदी उंची खोली क्षेत्रफळ मोजता येणे, व्याप्ती किती आहे हे सांगणे आजतागयत तरी अशक्य झाले आहे. म्हणून आपण सूर्यमालेशी संबंधित मंचमहाभुतांचा विचार करुया.

1) पृथ्वी-Earth

पृथ्वी हा सूर्यमालेतील एक ग्रह आहे. सूर्यमालेत बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनि, युरेनेस, नेप्चून हे आठ ग्रह असून हे सर्व ग्रह सूर्याभोवती फिरता, पृथ्वी हा गृह सूर्यापासून सरासरी 15 कोटी किलोमीटर अंतरावर असून सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचण्याठी 8 मिनिटे वेळ “लागतो.बुध, शुक्र नंतर पृथ्वी हा सूर्याला जवळचा ग्रह आहे. या आठ ग्रहांपैकी फक्त पृथ्वीवरच जीवसृष्टी आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पृथ्वीवर पंचमहाभूते आहेत. पृथ्वीवर ही पंचमहाभूते निर्माण व्हायला लाखो वर्षे लागली. पृथ्वी किंवा पृथ्वीवरील सजीवसृष्टी कोणत्याही ब्रह्मदेवाने निर्माण केलेली नाही. लाखो वर्षातील अनेक घडामोडीनुसार पृथ्वीवर, जल, वायू, मृदा निर्माण झाली. सुरुवातीला पाण्यात एकपेशीय जीव निर्माण झाले. पुढे भौतिक बदलानुसार सजीवांच्या अनुकूलन क्षमतेमुळे या एक पेशीय जीवांत बद‌ल होत गेले. हळूहळू जमिनीवर प्राणी, वनस्पती निर्माण झाले. हे सर्व जैविक घटक निर्माण होण्यासाठी पंचमहाभुतांचा हातभार लागला. म्हणून मानवी शरीर सुद्धा पंचमहाभुतांपासूनच निर्माण झाले आहे. असे म्हटले जाते. यांतील एक जरी भूत (घटक) नष्ट झाले, तरी जीवसृष्टीला धोका निर्माण होऊ शकतो.

2) आप (जल): Water:

पाणी म्हणजे जीवन होय. पाण्याशिवाय कोणताही जीव निर्माण होऊ शकत नाही किंवा जगू शकत नाही. यावरून पाणी (water) या पंचमहाभूतांतील घटकाचे किती महत्त्वाचे स्थान आहे, हे लक्षात येते, मानवी शरीरात 60% पाणी असते. हे प्रमाण 60% हून अधिक सुद्धा असते; पण कमी होऊन चालत नाही. पाणी हा पदार्थ ऑक्सिजन आणि हायड्रोजन या दोन वायूंच्या संयोगातू‌न बनला आहे. सूर्यमालेच्या परिक्षेत्रात हे वायू आहेत आणि ते निर्माण होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली ती पृथ्वीवरच. म्हणूनच पृथ्वीवर जलरुपात (द्रव) पाणी आढळते. अन्य काही ग्रहांवर शुष्क, बर्फ रुपात पाणी आढळल्याचे संशोधनात आढळले आहे. पाणी हा पंचमहाभुतांतील आणि सजीवसृष्टी निर्माण करण्यातील महत्त्वाचा घटक आहे.

 3) तेज (अग्नी, ताप) Fire

वनस्पतीच्या वाढीसाठी सूर्यप्रकाशाची आणि उष्णतेची गरज असते. अग्नी दृश्य- अदृश्य स्वरुपात पृथ्वीवर आढळतो. विविध धान्यांत, पदार्थात, फळांमध्ये, बियाणांमध्ये अग्नी हा ऊर्जा रुपात साठवला जातो. ही ऊर्जा पेटण्याचे म्ह‌णजेच उष्णता निर्माण करण्याचे काम करत असते. सर्व प्राण्यांना ऊर्जेची गरज असते.ही ऊर्जा प्राणी वनस्पतींतून घेतात. वनस्पतींना ही ऊर्जा सूर्य प्रकाशातून मिळते. म्हणजेच ऊर्जेचे मुख्य स्रोत सूर्य आहे. पृथ्वीवर जी जी वस्तू पेटते, जिच्यातून अग्नी प्रज्वलित होतो, त्या ऊर्जेचा उगमस्थान सूर्य हाच आहे. सजीव सृष्टीच्या निर्मितीतील महत्त्वाचा घटक सूर्य म्हणजेच तेज (अग्नी) हा आहे. हा अग्नी (तेज) पंच महाभुतांतील महत्त्वाचा घटक मानला जातो.

4) वायू (Gas):

जीवसृष्टीच्या निर्मितीतील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे वायू होय. महास्फोटानंतर ब्रह्मांडाची निर्मिती झाली, ब्रह्मांडात अनेक सूर्यमाला आहेत. पृथ्वी हा ग्रह असलेल्या सूर्यमालेत सुद्धा अनेक भौतिक बदल होत गेले. या घडामोडीतूनच पृथ्वीच्या सभोवार सुमारे 40 किलोमीटर उंचीवर वातावरणाचा पट्टा पसरलेला आहे. पृथ्वीच्या ठिकाणी असलेल्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे हा वातावरणाचा पट्टा अबाधित आहे. या वातावर‌णाच्या पट्ट्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी सुरक्षित आहे. ज्या ठिकाणी वातावरण आहे त्या ठिकाणीच सजीवसृष्टी निर्माण होऊ शकते. अशी स्थिती पृथ्वीवर आहे. म्हणूनच पृथ्वीवर जीवसृष्टी आहे. वात म्ह‌णजे वायू. विविध वायूंच्या मिश्रणाला हवा म्हणतात. हवेत म्हणजे वातावरणात, ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, कार्बन डायॉक्साइड ओझोन इत्यादी वायू, बाष्प, धुलिकण आढळतात. हे सर्व वायू सजीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहेत. म्हणजेच पंचमहाभूतातील वायूचे स्थान किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात आले असेल.

5) आकाश: Sky

आकाश हे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वातावरणाच्या वरचे दृश्य आणि भासमान आहे. ते निळ्या रंगाचे दिसते. आकाश निळे का दिसते? या माझ्या लेखात त्याचा उल्लेख आलेला आहे. आकाशात वातावरण आणि बाह्य अवकाश याचा समावेश होतो. तरी सुद्धा दूरदूरच्या बाह्य अवकाशापेक्षा वेगळे असे आकाश आहे. खगोल शास्त्रात आकाशाला खगोलीय गोलाकार म्हणतात . हा एक अमूर्त (आमासमान) गोलाकार असून यांतून सूर्य, चंद्र, ग्रह वाहताना दिसतात. पृथ्वीवरून आकाशाचा छोटासा भाग दिसतो. सजीवसृष्टीच्या निर्मितीसाठी आणि अस्तित्वासाठी आकाश (sky) हाही एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणूनच आकाशाचा समावेश पंचमहाभुतात केला आहे.

Leave a comment