Keshavrao Bhosle Theater / केशवराव भोसले नाट्यगृह

भारतातील सिनेसृष्टीचे जनक हे दादासाहेब फाळके आहेत. दादासाहेब फाळके हे कोल्हापुरचे आहेत, म्हणूनच कोल्हापूरला सिने सृष्टीचे जनक असे म्हटले जाते.
सिने संस्कृतीची खूप मोठी परंपरा कोल्हापूरकरांनी जपली आहे.केशवराव भोसले हे तर नात्यसंस्कृतीतील कोहिनूर हिरा आहेत. केशवराव भोसले यांनी नाट्य संस्कृतीतील महान परंपरा जोपासली. ती वृद्धिंगत केली आणि स्वकर्तृत्वावर आपला ठसा कायमचा उमटवला. केशवराव भोसले हे ही कोल्हापूरचेच. त्यांच्या नावाने केशवराव भोसले नात्यगृह कोल्हापुरात उभारले आहेत.या नात्यगृहाबद्दल आणि केशवराव भोसले बद्दल अधिक माहिती आपण घेऊया.

केशवराव भोसले: Keshavrao Bhosle:

केशवराव भोसले यांचा जन्म 9 ऑगस्ट 1890 रोजी झाला. त्यांना खूप अल्प आयुष्य मिळाले ; पण या अल्प आयुष्यात त्यांनी संगीत नाट्यक्षेत्रात खूप मोठे काम केले. म्हणूनच त्यांना संगीतसूर्य असे म्हटले जाते. केशवराव भोसले यांचा मृत्यू 4 ऑक्टोबर 1921 रोजी वयाच्या 32व्या वर्षी झाला.

मराठी संगीत रंगभूमीवरील म्हणजेच संगीत नाट्य क्षेत्रातील एक नामांकित कलाकार, गायक, उत्कृष्ट अभिनेता आणि त्याहून श्रेष्ठ असे यांचे स्त्री-पात्र हुबेहूब करणाचे अप्रतिम कौशल्य प्राप्त करणारा कलाकार म्हणजे केशवराव भोसले होय. 19 व्या शतकाच्या उंबरठ्यावर नाट्य क्षेत्रात स्त्री पात्र करण्यास स्त्री कलाकार मिळत नसत आणि चुकून मिळाल्या तर सामान्य अभिनयाच्या स्त्रिया मिळत. अशा वेळी स्त्री पात्राची हुबेहुब भूमिका करणारे एकमेव मराठी पुरुष कलाकार म्हणून केशवराव भोसले यांच्याकडे पाहिले जाते.

केशवराव भोसले यांचे वडील विठ्ठलराव आई जनाबाई होती. वडील वैद्य होते. केशवराव भोसले यांना लहान पणापासूनच नाट्यक्षेत्राची आवड होती. अगदी लहानपणीच ते नाटकात छोटी-छोटी कामे करू लागले.

कोल्हापूर शहरातील महत्त्वाची ठिकाणे / Places to visit in kolhapur

इ.स. 1902 मध्ये म्हणजे वयाच्या बाराव्या वर्षी केशवराव भासले यांनी गोविंद बल्लाळ देवल यांच्या शारदा या नाटकात शारदा ची प्रमुख स्त्री पात्राची भूमिका केशवराव यांना मिळाली.पहिल्याच शो च्या वेळी केशवराव भोसले यांनी अख्खे Theater डोक्यावर घेतले. एका रात्रीत त्यांच्या भूमिकेची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रात पसरली.

वडील वारल्यानंतर त्यांची आई नाटक मंडळीत स्वयापकीणीचे काम करत असत. त्यामुळे लहान वयातच त्यांच्या समोर नाटके व्हायची. ही नाटके पाहतच ते अभिनयाची कला शिकले .आणि शाळेत न जाणारा एक अशिक्षित मुलगा संगीत सूर्य झाला.शारदा नाटका नंतर केशवराव भोसले यांनी मागे वळून पाहिलेच नाही, सौभद्र, मृच्छकटिक या नाटकांतही केलेल्या स्त्री पात्राच्या भूमिका खूप गाजल्या .सौभद्र नाटकातील सुभद्रा, तर मृच्छकटिक नाटकातील वसंतसेना रसिकांच्या मनावर चांगलाच घुसल्या पुढे त्यांनी 1 जानेवारी 1908 रोजी म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षी हुबळी तेथे ‘ललितकलादर्श संगीत नाटक मंडळी’ नावाची नाटक कंपनी स्थापन केली. त्यांच्या नाटकाचा विषय हा लोकशिक्षण असा असायचा. पुढे त्यांनी राक्षसी महत्त्वाकांक्षा ‘हे नाटक वामनराव जोशी यांच्याकडून लिहून घेतले आणि त्यांत त्यांनी महत्त्वाच्या स्त्री पात्राची अप्रतिम भूमिका केली. केशवरावांच्या या ही स्त्री पात्राची भूमिका साऱ्या महाराष्ट्रात गाजली. या नाटकाचे मुंबईतही प्रयोग झाले. पुढे त्यांनी गायन कलेचे शिक्षण घेऊन त्यातही अप्रतिम प्रावीण्य मिळवले. केशवराव भोसले यांनी प्रथमच मानापमान या नाटकातून पुरुष भूमिका साकारली. या नव्या भूमिकेला लोकांनी उदंड प्रतिसाद दिला. पुढे त्यांनी बालगंधर्वासोबत काही नाटकात भूमिका केली.

केशवराव मोसले नाट्यगृह : Keshavrao Bhosle Theater

कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे दूरदृ‌ष्टीचे छत्रपती होते. त्यांनी लोककल्याणार्थ अनेक योजना राबवल्या. कुस्तीची परंपरा जोपासली. तसे नाट्य क्षेत्रास‌ाठी ए‌खादी इमारत असावी म्हणून शाहू खासबाग मैदान परिसरात एक नाट्यगृह उभारले. 1913 साली या नाट्यगृहाच्या इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली. 1915 साली नाट्यगृह बांधून पूर्ण झाले. 1915 साली कोल्हापूरचे युवराज राजाराम महाराज यांनी नाट्यगृहाचे उद्घाटन केले आणि या नाट्यगृहात नाट‌काचे खेळ सुरु झाले. उद्घाटना दि‌वशी विजयादशमी हा सण होता.

राजर्षी शाहू महाराज 1902 साली रोमला गेले होते. तेथील नाट्यगृहे पाहिल्यावर त्यांनाही आपल्या कोल्हापुरात असे नाट्यगृह उभारण्याचे सुचले होते.

केशवराव भोसलेन नाट्यगृहातील पहिले नाटक :The First Play of keshavrao Bhosle Theater

केशवराव भोसले नाट्यगृहाचे नाव ‘पॅलेस थिएटर’ असे होते. त्यावेळी या नाट्यगृहात मानापमान हे पहिले नाटक सादर केले गेले.

केशवराव भोसले नाट्यगृह असे नामकरण : Renamed Keshavrao Bhosale Theater.

महाराष्ट्राचे तत्कालीन (1357) बांधकाम मंत्री बाळासाहेब देसाई यांनी Palace Theater चे नामकरण केशवराव भोसले नाट्यगृह असे नामकरण करून केशवराव भोसले यांच्या कर्तृत्वाला न्याय दिला. या नाट्यगृहात एकापेक्षा एक अशा दिग्गज कलाकारांनी आपली अभिनय कला सादर केली आहे.

नाट्यगृहाचा काळा दिवस: Black Day of Keshavrao Bhosle Theater

8 ऑगस्ट 2024 रोजी रात्रीच्या वेळी अचानक केशवराव भोसले नाट्यगृहाला शॉर्ट सर्किटने आग लागली आणि सारे काही होत्याचे नव्हते झाले. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक झाले. कोल्हापूरचे विद्यमान खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमण्यात आली. आणि याच जाग्यावर पुन्हा नवीन नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेतला गेला. महानगरपालिका आणि राज्य सरकार यांच्या सहकार्यातून लवकरच हे नाट्यगृह डौलाने उभे राहील अशी आशा करुया.

Leave a comment