भारतातील तेलंगणा राज्यातील हैद्राबाद शहरात हुसेन सागर, सरोवरात जिब्राल्टर रॉक Jibraltar Rock वर स्थापित केलेला गौतम बुद्धाचा पुतळा हे हैद्राबाद शहरातील प्रमुख आकर्षण आहे. राज वैभवाचा त्याग करून संन्यस्त जीवन जगणाऱ्या बुद्धांनी जगाचे दुःख निवारण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. माणसाला दुःख का होते? दु:खाचे निवारण करता येते का ? दुःख निवारण करण्याचे उपाय काय ? या तीन प्रश्नांची उत्तरे त्यांनी कठोर तपश्चर्या करून शोधली आणि दुःख निवारण्याचे उपाय सुचवले. बुद्धांचे विचार जतन करून ठेवण्यासाठी बौद्ध अनुयायांनी अनेक ठिकाणी पुतळे उभारले.गुहा खोदून बौद्ध चरित्र व जातक कथा शिल्परूपात मांडल्या आणि बुद्धांचा विचार संपूर्ण जगात पोहोचवला. तेलंगणा राज्यातील हैद्राबाद शहरात हुसेन सागर सरोवरात (Hussain Sagar Lake) जिब्राल्टर रॉक (Jibraltar Rock) वर गौतम बुद्धांचा भव्य पुतळा (statue of Buddha) उभारलेला आहे. या पुतळ्याविषयी आपण माहिती घेऊया .
ठिकाणाचे नाव : बुद्ध पुतळा
ठिकाण. :हुसेन सागर झील
शहर : हैद्राबाद
जिल्हा : हैद्राबाद
राज्य. :तेलंगणा
स्थापना : 1 डिसेंबर 1992
पुतळ्याची उंची : 17.5 मीटर
पुतळ्याचे वजन : 150 मेट्रिक टन
मूर्तीकार. : एस एम गणपती
बुद्ध पुतळा :Statue of Buddha, Lumbini Park.
भारतातील पूर्वीच्या आंध्रप्रदेश राज्यातील हैद्राबाद शहरात हुसेन सागर सरोवर (Hussain Sagar Lake) प्रसिद्ध आहे. 2 जून 2014 रोजी भारत सरकारने भारताचे 29 वे नवीन राज्य स्थापन केले. या राज्याचे क्षेत्रफळ 1,12,077 चौरस किमी आहे. याच तेलंगणा राज्यात हैद्राबाद शहर समाविष्ट झाल्याने हुसेन सागर सरोवरात स्थापित केलेला बुद्ध पुतळा तेलंगणा राज्यात समाविष्ट झाला. बुद्धंम् शरणम् गच्छामि। धम्मम् शरणम् गच्छामि। हे बौद्ध धर्माचे ब्रीद वाक्य जिब्राल्टर रॉकवरील (Jibraltar Rock) गौतम बुद्धांचा पुतळा पाहताना निश्चितच आठवते. आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री एम.टी. रामाराव एकदा अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. तेथे यांनी Statue of Liberty पाहिल्यानंतर ते खूप भारावून गेले आणि अशा प्रकारचा सुंदर पुतळा त्यांनी आपल्या आंध्रप्रदेशच्या राजधानाच्या शहरात म्हणजेच हैद्राबाद शहरात बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी हुसेन सागर सरोवर निवडले. आणि या सरोवरात मध्यवर्ती ठिकाणी जिब्राल्टर रॉक (Jilbralter Rock) निर्माण केले. आणि हा रॉकवर 150 मेट्रिक टनांचा पुतळा उभारण्याचे काम एस.एम. गणपती या मूर्तीकाराला दिले . या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती एकाच भव्य दगडापासून बनवलेली आहे. कोठेही जोड दिलेला नाही. प्रचंड वजनाची ही मूर्ती पाण्यातून बोटीच्या साहाय्याने नेत असताना काहीतरी तांत्रिक चुकीमुळे मूर्ती तलावात पडली. त्यावेळी बारा लोकांना प्राण गमवावे लागले. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर ती मूर्ती पाण्याबाहेर काढली आणि 1 डिसेंबर 1992 रोजी जिब्राल्टर रॉक (Jibraltar Rock) वर स्थापित करण्यात आली.
जिब्राल्टर रॉकवर बोटीने जावे लागते. सध्या बोटीने जाण्यासाठी 50 रुपये तिकीट आहे.जलद बोटीने जाण्यासाठी 350 रुपये तिकीट आहे. पुतळा उभा करण्यासाठी बनवलेल्या चौथऱ्यावर बुद्धाचे शिल्परूपात जीवन चरित्र कोरलेले आहे. या ठकाणी अशोक चक्रही कोरलेले आहे. हैद्राबाद शहरातील हुसेन सागर सरोवरात जे जिब्राल्टर रॉक (Jibraltar fork) निर्माण केले आहे त्याला लुम्बिनी पार्क (Lumbini Park) असे नाव दिले आहे. सायंकाळी सात वाजता याठिकाणी लेझर शो Laser Show असतो. गौतम बुद्धांची 17.5 मीटर उंची असलेली पूर्णाकृती पुतळा पाहिल्यानंतर संध्याकाळी लेझर शो पाहायचा आणि परतीच्या प्रवासाला लागायचे.