Buland Darwaza / फतेहपूर सिकरी: बुलंद दरवाजा

उत्तरप्रदे‌शातील एक नामांकित ऐतिहासिक शहर म्हणून फतेहपूर सिकरी हे शहर आहे. एके काळी याच फतेहपूर सिक्री याच शहरात मुघल सम्राट अकबर याने आपल्या राजधानीचे शहर बनवले होते. या शहरातील बुलंद दरवाजा खूप प्रसिद्ध आहे. फतेहपूर सिकरीची ओळख बुलंद दरवाजामुळे संपूर्ण भारतभर आणि जगभरातही झाली आहे. या फतेहपूर सिक्रीमध्ये बुलंद दरवाजा [Buland Darwaza] शिवाय पंच महाल, होली स्मारक, जामा मशिद, जोधाबाईचा राजवाडा इत्यादी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. त्यांपैकी बुलंद दरवाजाची आपण माहिती घेणार आहोत.

स्थळाचे नाव : बुलंद दरवाजा

कोठे आहे: फतेहपूर सिक्री

स्थळाचा प्रकार : ऐतिहासिक वास्तू.

स्थापना :1575

संस्थापक : सम्राट अकबर

जिल्हा. :आग्रा

राज्य : उत्तर प्रदेश

लखनौपासून अंतर : 122 किलोमीटर

वास्तु शिल्पकार : सलीम चिश्ती

फतेहपुर सिकरी कशासाठी प्रसिद्ध आहे? What is the city Fatehpur Sikri famous for?

सम्राट अकबर हा सुमारे चाळीस वर्षे (1556 ते 1605) मुघल बाद‌शाह म्हणून सत्तेवर होता. त्याने आपल्या कारकीर्दीत चार ठिकाणी राजधानी म्हणून कामकाज केले. आग्रा येथे बाबरने मुघलांची राजधानी वसवली. पुढे अकबरने आग्रा येथून (1556 ते 1571) काही काळ राज्य कारभार केला. त्यानंतर त्याने आपल्या राजधानीचे शहर फतेहपूर सिकरी (1571 ते 1585) हे निवडले. याच काळात त्याने गुजरात दौऱ्यावर असताना मोठा विजय मिळवला. त्या विजयाच्या प्रीत्यर्थ अकबरने सलीम चिश्ती या वास्तुविशारद कडून बुलंद दरवाजा बांधून घेतला. हा दरवाजा 1575 साली बांधला गेला. आजही तो मजबूत स्थितीत आहे.

फतेहपूर सिकरी हे शहर मुघल काळात सम्राट अकबरने वसवलेले राजधानीचे शहर असून याच शहरात बुलंद दरवाजा आहे. या दोन बाबींसाठी फतेहपूर सिकरी अधिक प्रसिद्ध आहे. शिवाय येथील राजमहालही प्रसिद्ध आहेत.

जामा मशिद दिल्ली: Jama Masjid, Delhi

जगातील सर्वांत उंच प्रवेशद्वार कोणते ? Which is the highest Gate in the world?

जगातील सर्वांत मोठे प्रवेशद्वार भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील फतेहपूर सिकरी शहरात आहे. त्याचे नाव बुलंद दरवाजा [Buland Darwaza] असे आहे. जगातील सर्वांत मोठे (उंच) प्रवेशद्वार म्हणून ज्या द‌र‌वाजाला मान मिळाला आहे तो दरवाजा म्हणजे बुलंद दरवाजा होय. हा बुलंद द‌र‌वाजा सम्राट अकबरने 1575 मध्ये बांधून घेतला आहे. अनेक ठिकाणी अकबर बाद‌शाहने 1571 मध्ये बुलंद दरवाजा बांधून घेतला. असा उल्लेख आहे; पण ते संयुक्तिक वाटत नाही 1571 अकबरने फतेहपूर सिकरी हे शहर वसवले होते. त्यानंतर त्याने त्याच वर्षी आपली राजधानी आग्र्याहून फतेहपूर सिकरीला हलवली. 1575 साली अकबर गुजरात दौर्‍यावर असताना मोठा विजय मिळवला. त्या विजयाप्रीत्यर्थ ‘बुलंद दरवाजा बांधून घेतला. असेही म्हटले जाते.

फतेहपूर सिकरी हे जगातील सर्वात उंच प्रवेशद्वार असून त्याची उंची 53.63 मीटर म्हणजे सुमारे 176 फूट उंचीचे हे प्रवेशद्वार आहे. या बुलंद दरवाजाची रुंदी 35 मीटर आहे. संपूर्ण दरवाजाचे बांधकाम लाल रंगाच्या द‌गडात बांधलेले आहे. आणि शुभ्र संगमरवरी द‌गडाने दरवाजाला सुशोभित केले आहे. बुलंद दरवाजा हे फतेहपुर सिकरीचे प्रवेशद्वारच आहे.

उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध आग्रा शहरापासून 45 किलोमीटर अंतरावर असून लखनऊ या राजधानीच्या शहराच्या ठिकाणापासून फतेहपुर सिकरी 122 किलोमीटर अंतरावर आहे.

Leave a comment