Diwali Festival / दिवाळी

दिवाळीचा सण मोठा ।
आनंदाला नाही तोटा ॥

असे म्हणतात, याप्रमाणेच दिवाळीचा सण आहे. दिवाळीचा सण हा शेतकऱ्यांचा सण आहे. हा सण कृषिप्रधान आहे . विशेष म्हणजे हा सण अवैदिक परंपरेतून आला आहे.

बळी परंपरेतील राजे हे कृषिप्रधान होते. ते शेतकऱ्यांचे हितचिंतक होते. याच परंपरेतून दिवाळीचा सण आला आहे. दिवाळीला संस्कृतमध्ये दीपावली म्हणतात. दीप + आवली = दिव्यांची ओळ (रांग) = दीपावली होय. प्राकृत म्हणजे मराठी भाषेत दिवाळी म्हणतात. दिवा + अळी = दिवाळी = दिव्यांची अळी म्हणजेच दिव्यांची रांग. थोडक्यात दिवाळी हा दीपोत्सवाचा सण आहे. म्हणूनच घरोघरी आकाश कंदील लावतात.

1) वसुबारस (गोवत्स पूजा): vasubaras.

दिवाळीच्या सणाची सुरुवात वसुबारस या सणातून होते. म्हणजे दिवाळीच्या सणात पहिला मान पशू पूजेला. या दिवशी शेतकरी लोक गाय आणि तिच्या वासराची पूजा करतात. शेतकरी गाईला मातेचा दर्जा देतात. तिच्या पोटी जन्मलेले वासरू पुढे मोठे झाल्यावर शेतकऱ्याला शेतीच्या कामात मदत करणार असते. म्हणून दिवाळीच्या सणात पहिला मान गाय आणि वासराला (वसुबारस) देतात.

दिवाळीतील वसुबारस हा सण आश्विन शुद्ध ‌ एकाद‌शीला येतो. याच दिवशा गोवत्स द्वादशी पण येते.

2) धन त्रयोदशी / धन्वंतरी जयंती: Dhantrayodashi/ Dhanvantari Jayanti:

आश्विन शु‌द्ध 12: या दिवशी धनत्रयोद‌शी हा सण असतो. हा सणही शेतीशी संबंधित आहे. धन्वंतरी म्हणजे धनधान्य. आपल्या शेतामध्ये पिकलेल्या विविध धनाच्या राशीची आपण या दिवशी पूजा करतो आणि धान्याची राशी अशीच वाढू दे म्हणून धन्वंतरीची पूजा करतो. धनधान्याची पूजा करण्याचा हाच तो दिवस होय. शेतकऱ्यांसह सर्वच जण धनत्रयोदशीचा उत्सव मोठ्या उत्साहाने करतात.

3. नरकचतुर्दशी: Narak-Chaturdashi

नरक चतुर्दशी हा सण दिवाळीत आश्विन शुद्ध 4 म्हणजे आश्विन महिन्यात चतुर्दशीला हा सण साजरा करतात. महाभारत समकाळात नरकासूर हा बलाढ्य राजा होता. तो आपल्या बळाचा दुरुपयोग करुन लोकांवर, स्त्रियांवर अन्याय, अत्याचार करायचा. एकदा तर या नरकासूराने 16000 स्त्रियांना (तरुणींना) पकडून कैद करून ठेवले होते. श्री कृष्णाला ही बातमी समजल्यावर त्याने स्वतःहून नरकासूरावर आक्रमण केले. नरकासूराचा वध केला आणि 16000 स्त्रियांना मुक्त केले. तो दिवस होता आश्विन शुद्ध चतुर्दशीचा. हा सण श्रीकृष्णाच्या पराक्रमाचे प्रतीक म्हणून आपण साजरा करतो. पण यादिवशी डाव्या पायाच्या अंगठ्याने चिरोटे (कडू काकडी-ही गोलाकार लिंबासारखी असते) फोडून साजरा करण्याचा अर्थ काय? वामनाने बळीराजाच्या मानेवर पाय देऊन वचनात अडकवून बळीराजाला मारले. याची प्रतिकात्मक कृती तर नाही ? अशी शंका येते. नरकासूराचा वध केला ही आनंदाची बातमी होती. पण चिरोटे फोडण्याच्या प्रथेत काहीतरी काळेबेरे असल्याचे जाणवते. पुढे बलिप्रतिपदा या सणात सविस्तर चर्चा होईल.

कृष्णाने केले पुण्य-माथी मारले पाप:

कृष्णाने 16000 स्त्रियांची सुटका करण्यासाठी नरकासूराचा वध केला. या सर्व स्त्रिया कृष्णाला सखा म्हणू लागल्या. तत्कालीन अनमाणसात कृष्णाबाबत आदर होता . त्याला सखा म्हटल्यावर आपल्याकडे हीनदृष्टीने कोणी पाह‌णार नाही. नरकासुराने पळवून नेलेल्या स्त्रिया म्हणून कोणी हेटाळणी करणार नाही, हा त्या स्त्रियांचा हेतू होता. आणि ते बरोबरही होते ; पण दुदैव हे की अनेक कथाकारांनी कृष्णाच्या या 16000 बायका केल्या. कृष्णालाच आरोपाच्या पिंजऱ्यात बसवले. त्याला स्त्रीलंपट ठरवला. ही त्या त्या लेखकांची विकृतीच म्हणावी लागेल. कृष्णजन्माष्टमी या लेखात मी सविस्तर लिहिले आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमी/ krishna janmashtami

4. दीपावली- कुबेर पूजन Deepawali- kuber pujan:

आश्विन कृष्ण 2 म्हणजे अमावस्येला कुबेर पूजन करतात. कुबेर हा रावणाच ज्येष्ठ बंधू. तो लंकेचा राजा होता. तो खूप श्रीमंत आणि धनवान होता. त्याचा भारताशी वारंवार व्यापारानिमित्त संबंध असायचा. त्याच्याकडे अनेक चांगले गुण होते. कुबेराचे स्वत‌:चे पुष्पक यान होते. अशा या धनाढ्य, बलाढ्य कुबेराची पूजा या आश्विन महिन्याच्या अनावश्येला म्हणजे दीपावली दिवशी सर्वत्र दिवे लावून करतात.

या दिवशी लक्ष्मी पूजनाची कथा मध्येच घुसवली आहे. लोकांनी डोळे डोळे उघडे ठेवून फक्त कुबेरावी पूजा करावी.

5) बलिप्रतिपदा : Baliprati pada

कार्तिक शुद्ध प्रतिपदे‌ला बळीराजाच्या सन्मानार्थ बलि- प्रतिपदा हा सण साजरा करतात. याच दिवशी दीपावली पाडवा हा सणही साजरा करतात. बलिप्रतिपदा हा सण परा‌क्रमी बळीराजाचा वाडा घरोघरी बनवतात. पूर्वीच्या काळी हा वाडा शेणाच्या गवळणी बनवून त्याचा वाडा करत. या बलिप्रतिपदेची कथा आणि इतिहास खूप मोठा आहे.त्याबद्दल अधिक माहिती आपण दीपावली आणि बलिप्रतिपदा या स्वतंत्र लेखात पाहणार आहोत.

(6) भाऊबीज Bhaubij:
कार्तिक शुद्ध द्वितीया बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणूम भाऊबीज हा सण साजरा करतात. दिवाळीच्या सणातील भाऊबीज हा सण बहीण-भावाचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी साजरा करतात, बहिणीचे लग्न झाले असेल तर बहीण माहेरी येऊन भावाला ओवाळते. रक्षाबंधनाच्या दिवशग भाऊ बहिणीकडे जातो. भाऊबीजेला भाऊ बहिणीसाठी साडीचोळी घेतो.बहीण भावासाठी गोडधोड खायला बनवते हा सण कार्तिक शुद्ध द्वितीयेला येतो.

(7) पांडव पंचमी: Pandav. Panchami

कार्तिक शुद्ध पंचमीला पांडव पंचमी हा सण करतात. या दिवशी परसदारात शेणापासून बनवलेल्या पाच पांडवांची पूजा करतात.

दिवाळीच्या सणात प्रवेश द्वारात शेणापासून बनवलेला घुमट असतो. हा घुमट झेंडूच्या फुलांनी सजवलेला असतो.

Leave a comment